Pakistan : ते अपयशी राष्ट्र, भारताला शांततेत जगू देणार नाही, औवेसी म्हणाले, पंतप्रधानांनी…

भारत-पाकिस्तान(Pakistan) संघर्षावरून एमआयएमचे खासदार असदुद्दीन औवेसींनी पाकड्यांना पुन्हा एकदा फटकारले. ते एक अपयशी राष्ट्र असून भारताला शांततेत जगू देणार नाही, असे म्हणत औवेसींनी पुन्हा एकदा पाकिस्तानला चांगलचं फटकारले आहे.

62

भारत-पाकिस्तान(Pakistan) संघर्षावरून एमआयएमचे खासदार असदुद्दीन औवेसींनी पाकड्यांना पुन्हा एकदा फटकारले. ते एक अपयशी राष्ट्र असून भारताला शांततेत जगू देणार नाही, असे म्हणत औवेसींनी पुन्हा एकदा पाकिस्तानला चांगलचं फटकारले आहे. ते म्हणाले, पंतप्रधानांनी इतकी कठोर कारवाई करावी अपयशी राष्ट्र(Pakistan) भारताला धक्का पोहोचविण्यापूर्वी शंभरवेळा विचार करेल. अशा धोक्यांना तोंड देताना त्यांनी भारतीयांमध्ये एकतेचे आवाहन केले. “जेव्हा कोणी भारताकडे बोट दाखवते तेव्हा आपण आपले सर्व मतभेद विसरून भिंतीसारखे एकत्र उभे राहतो,” असे ते म्हणाले.

(हेही वाचा Pahalgam Terror Attack : भारताने युरोपियन महासंघाला खडसावलं, म्हणाले…)

दरम्यान, एमआयएम खासदार असदुद्दीन औवेसींनी दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानवर केंद्र सरकारने कठोर आणि निर्णायक कारवाई करण्याचे आवाहनही यावेळी केले. एका जाहीर सभेला संबोधित करताना ओवैसी म्हणाले, आम्हाला आशा आहे की, पंतप्रधान मोदी पाकिस्तानी दहशतवाद्यांवर आणि पाकिस्तानच्या अपयशी राज्यावर कठोर कारवाई करतील. जेणेकरून ते(Pakistan) पुन्हा भारताला नुकसान पोहोचवण्यासाठी कोणालाही पाठवण्यापूर्वी शंभर वेळा विचार करतील.

ते पुढे म्हणाले, मागील दहशतवादी हल्ल्यांनंतर भारताच्या पुराव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या पाकिस्तानवर टीका करताना म्हणाले, तुम्ही निर्लज्जपणे पुरावे मागत आहात. आम्ही तुम्हाला पठाणकोटला आमंत्रित केले होते. तेव्हा दहशतवाद्यांनी आमच्या हवाई दलाच्या तळावर हल्ला कुठे केला होता ते दाखवले नव्हते का? त्यांनी ते स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले, तरीही तुम्ही(Pakistan) त्या दहशतवाद्यांवर कोणतीही कारवाई केली नाही,” असे ते म्हणाले(Pakistan)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.