Pahalgam Terror Attack : पंतप्रधान मोदींनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत काय घडलं ? किरेन रिजिजू म्हणाले …

Pahalgam Terror Attack : पंतप्रधान मोदींनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत काय घडलं ? किरेन रिजिजू म्हणाले ...

139
Pahalgam Terror Attack : पंतप्रधान मोदींनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत काय घडलं ? किरेन रिजिजू म्हणाले ...
Pahalgam Terror Attack : पंतप्रधान मोदींनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत काय घडलं ? किरेन रिजिजू म्हणाले ...

पहलगाममधील हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारत सरकारने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. यावेळी भारताने पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी याआधी कधीही न घेतलेले निर्णय घेतले आहेत. भारताने 1960 सालचा ऐतिहासिक असा सिंधू जलवाटप करार स्थगित केला आहे. या मोठ्या निर्णयासह भारताने इतरही काही महत्त्वाचे निर्णय घेतला आहेत. दरम्यान, सरकारच्या या निर्णयानंतर 24 एप्रिल रोजी दिल्लीमध्ये एक सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत सरकारने विरोधकांना पहलगाम हल्ल्यानंरच्या भारताच्या भूमिकेची आणि पहलगाममधील सद्यस्थितीची माहिती दिली. (Pahalgam Terror Attack)

या बैठकीत काय घडलं या संदर्भातील माहिती केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी माध्यमांना दिली. किरेन रिजिजू यांनी सर्वपक्षीय बैठकीनंतर माहिती देताना म्हटलं की, “गेल्या काही वर्षांपासून काश्मीरमध्ये शांततेत लोक व्यापार करत होते, पर्यटक येत होते, सर्व चांगलं सुरु होतं. या घटनेमुळं वातावरण बिघडलं यावर सर्वांनी चिंता व्यक्त केली. सर्व राजकीय पक्षांनी त्यांचे विचार मांडले. दहशतवादाविरुद्ध भारताला एकजूट होऊन लढाई लढावी लागेल, हे सर्वांनी मान्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये जे भाषण केलं ते सर्वांनी ऐकलं आहे. भारत दहशतवादावर कठोर प्रहार करण्यात आला तो यापुढं देखील केला जाईल.” (Pahalgam Terror Attack)

दहशतवादाविरोधातील लढाईत सर्व राजकीय पक्ष सोबत आहेत. सरकार जे पावलं उचलेल त्यांच्या सोबत असेल, असं राजकीय पक्षांनी सांगितल्याचं किरेन रिजिजू म्हणाले. ही बैठक सकारात्मकतेनं संपली. दहशतवादाविरुद्ध एकजुटीनं लढाई लढायची, हे यापुढं देखील कायम राहील. अशा घटनांच्या काळात एकमेकांकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहू नये, राजकारण करु नये, असं आवाहन केल्याचं रिजिजू यांनी सांगितलं. या वातावरणात देश एकजूट राहिला पाहिजे हा संदेश दिला आहे. (Pahalgam Terror Attack)

दहशतवादाविरूद्धच्या लढाईत आपण यशस्वी होऊ, पाकिस्तान आणि ज्यांनी कुणी ही घटना घडवली आहे त्यांचा बदला घेणार आहोत. यासाठी एकजूट राहू आम्ही हे मानतो, असं किरेन रिजिजू यांनी म्हटलं आहे. (Pahalgam Terror Attack)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.