Pahalgam Terror Attack : पहलगाममध्ये (Pahalgam terrorist attack) गेल्या आठवड्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत उच्चस्तरीय बैठकांचे सत्र सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही सैन्यदल प्रमुख, संरक्षणमंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्यासोबत महत्त्वाची बैठक घेतली. त्यानंतर ‘या’ केंद्रीय मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्यासोबत चर्चा केली. या बैठकीत महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. (Pahalgam Terror Attack)
(हेही वाचा – Indus Water Treaty: होय, सिंधूच्या पाण्याचा एकही थेंब पाकिस्तानात जाऊ शकत नाही!)
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही सैन्यदल प्रमुख, संरक्षणमंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांच्यासोबत महत्त्वाची बैठक घेतली. यांनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी पोहोचले. यावेळी पंतप्रधान मोदी, शाह आणि राजनाथ सिंह यांच्यात उच्चस्तरीय बैठक झाली, या बैठकीत कोणत्या विषयांवर चर्चा झाली. संबंधित बैठकीनंतर काय होईल? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
याच बैठकीदरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक (RSS) मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra) यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. पंतप्रधान मोदी आणि मोहन भागवत यांच्यात ही नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि मोहन भागवत यांच्या या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
(हेही वाचा – Indian Army तील ३ महत्त्वाच्या पदांवर नव्या अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या; काय आहेत बदल ?)
तसेच या बैठकीत पंतप्रधान मोदींनी तिन्ही सशस्त्र दलांवर पूर्ण विश्वास व्यक्त केला. जर पाकिस्तानला योग्य उत्तर द्यायचे असेल तर लष्कराने वेळ ठरवावी. या निर्णयात कोणीही हस्तक्षेप करणार नाही, असे पंतप्रधान मोदींनी लष्कराला (Army) सांगितले आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात भारतीय सैन्य कोणते निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही पहा –