
Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीर येथील पहलगाममध्ये पाकपुरस्कृत दहशदवाद्यांनी निष्पाप २६ भारतीय हिंदूची गोळ्या झाडून हत्या केली. यावेळी भारत आणि पाकिस्तानमध्ये तनावग्रस्त वातावरण आहे. दरम्यान जम्मू-कश्मीर मधील पहलगाम येथील हल्ल्यातून सुखरूपपणे कणकवली तालुक्यातील तळेरे येथील पावसकर कुटुंबीय आपल्या मुळगावी पोहोचले. त्यानंतर पावसकर कुटुंबियांची पालकमंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी भेट घेतली. यावेळी पहलगाम येथे घडलेला घटनाक्रम पावसकर कुटुंबियांनी मंत्री नितेश राणे यांना सांगितला. यावेळी येथील आनंदी असलेले वातावरण दहशतवादी हल्ल्यानंतर (Terrorist attack) कसे भयग्रस्त झाले. याचे वर्णन यावेळी पावसकर कुटुंबियांनी केले. (Pahalgam Terror Attack)
(हेही वाचा – Indo – Pak Sports War : नदीम अर्शदने नीरज चोप्राचं भालाफेक स्पर्धेचं निमंत्रण का नाकारलं?)
जम्मू काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथील आतंकवादी परिसरातून सही सलामत आपल्या तळेरे गावी आलेले पावसकर कुटुंबियांची मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी भेट घेऊन त्या ठिकाणच्या परिस्थितीची माहिती घेतली. पहलगाम येथे इस्लामिक आतंकवादी हल्ल्यात निरपराध हिंदूंची हत्या केली. या हल्ल्या दिवशी सकाळीच पहलगाम येथून दुसऱ्या ठिकाणी तळेरे येथील पावसकर कुटुंब दुसऱ्या ठिकाणी पर्यटनासाठी गेले. आणि त्याच दिवशी दुपारी हिंदूंवर हा हल्ला झाला. तिथल्या वातावरणामुळे मंगळवारी पहलगाम येथे पर्यटन करण्याचा त्यांची वेळ बदलली आणि त्या हल्ल्यातून पावसकर कुटुंब बचावले.
(हेही वाचा – Pahalgam Terror Attack च्या पार्श्वभुमीवर जॉर्जियो मेलोनींचा पंतप्रधान मोदींना फोन ; म्हणाल्या …)
जम्मू काश्मीर येथील पर्यटनासाठी तळेरे येथील तनय सचिन पावसकर, मिहीर योगेश पावसकर, इशा योगेश पावसकर, साहिल सागर पावसकर, साक्षी संदीप पावसकर, ऋचा प्रमोद खेडेकर हे सहाजण गेले होते. तिथल्या वातावरणामुळे पर्यटनाची वेळ बदलली आणि आम्ही त्या हल्ल्यातून सुखरूप वाचलो. मात्र, त्या हल्ल्याची दाहकता आम्हाला जाणवत होती. विमानस्थळ आणि इतर सर्वच ठिकाणी हल्ल्यानंतर नागरिकांची धावपळ सुरू झाली. सुदैवाने विमानाची तिकीट मिळाली आणि गुरुवारी सकाळी आम्ही सुखरूप तळेरे गावी पोहोचलो. यावेळी पालकमंत्री नितेश राणे (Guardian Minister Nitesh Rane) यांनी त्या सहाही जणांशी संवाद साधला आणि तिथली नेमकी परिस्थिती जाणून घेतली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community