
-
प्रतिनिधी
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये (BJP) संघटनात्मक फेरबदलांची जोरदार चर्चा सुरू आहे. महाराष्ट्र भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठीचे नाव जवळपास निश्चित झाले असले तरी, मुंबई भाजपा अध्यक्ष पदावर मात्र अजूनही अनिश्चिततेचे मळभ कायम आहे.
मुंबई अध्यक्षपदासाठी प्रवीण दरेकर, आमदार अमित साटम आणि सुनील राणे या तीन नावांची जोरदार चर्चा आहे. मात्र या तिन्ही नावांपैकी अंतिम निर्णय कुणाच्या बाजूने होणार यावर पक्षात अजून एकमत झालेले नाही.
दरम्यान, सध्याचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडेच आगामी काही महिने मुंबईची जबाबदारी ठेवायची का, की नवा चेहरा आणायचा, यावर भाजपामध्ये (BJP) विचारमंथन सुरू आहे. विशेषतः मुंबई महापालिका निवडणुकीसारख्या महत्त्वाच्या लढतीच्या पार्श्वभूमीवर, नेतृत्व कोणाकडे सोपवायचे यावर भाजपा हायकमांड विचारपूर्वक निर्णय घेणार आहे.
भाजपाच्या (BJP) अंतर्गत सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या पंधरा दिवसांत या विषयावर निर्णायक बैठक होणार असून, अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील तसेच विशेषतः मुंबईतील भाजपा कार्यकर्त्यांचे लक्ष या निर्णयाकडे लागले आहे.
(हेही वाचा – पश्चिम रेल्वेवर शनिवारपासून 36 तासांचा Mega Block; 162 लोकल गाड्या रद्द, प्रवाशांना मोठा फटका)
मुख्य मुद्दे :
- महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष पदासाठीचे नाव जवळपास निश्चित.
- मुंबई अध्यक्षपदासाठी प्रवीण दरेकर, अमित साटम आणि सुनील राणे या नावांची चर्चा.
- आशिष शेलार यांच्याकडेच जबाबदारी ठेवायची की नव्या चेहऱ्याची घोषणा करायची, यावर पक्षात विचार सुरू.
- आगामी १५ दिवसांत अंतिम निर्णय होण्याची शक्यता.
भाजपाच्या (BJP) मुंबईतील नेतृत्वावरचा निर्णय महत्त्वाचा ठरणार असून, तो आगामी महापालिका निवडणुकीतील पक्षाच्या रणनीतीवर मोठा परिणाम करू शकतो.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community