Operation Sindoor : लष्करी कारवाईचं मुख्यमंत्र्यांकडून स्वागत; विरोधकांना सुनावले

भारतीय सैन्यदलाने 'Operation Sindoor' अंतर्गत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय सेनेचे मनापासून आभार मानले.

102

भारतीय सैन्यदलाने ‘Operation Sindoor’ अंतर्गत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय सेनेचे मनापासून आभार मानले. ते म्हणाले, पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवाद्यांचे ०९ अड्डे उद्ध्वस्त करण्याचे काम भारतीय सैन्यदलाने केले. जम्मू व काश्मीरमधील दहशतवाद विशेषतः पहलगाममधील हल्ल्याविरुध्द कडक कारवाई केल्यानंतर भारतीयांना समाधान वाटतं आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना दिली.

(हेही वाचा Operation Sindoor : पाकव्याप्त काश्मीरमध्ये उद्ध्वस्त केलेली ‘ही’ ९ ठिकाणे होती आतंकवाद्यांची लाँचपॅड )

दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर आम्ही दहशतवाद सहन करणार नाही असे पंतप्रधान म्हणाले होते त्यांचे मी विशेष आभार मानतो. २६/११ मधील सूत्रधार हाफिज सईद, डेव्हिड हेडली यांसारख्यांचे जेथे प्रशिक्षण झाले तेथे अड्डे भारतीय सैन्यदलाने उध्द्वस्त केले आहेत. दहशतवादाविरोधात प्रचंड मोठी लढाई भारताने या माध्यमातून केलेली आहे. हा नवा भारत असून असे हल्ले सहन करणार नाही हे पुन्हा एकदा भारताने दाखवून दिल्याचेही मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले.

राज ठाकरेंनी केलेल्या विधानावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ते काय म्हणतात याला महत्त्व नाही. संपूर्ण भारत या कारवाईच्या पाठीशी उभा असून संपूर्ण भारत या कारवाईचे स्वागत करतो. तसेच, Operation Sindoorबाबत ते म्हणाले, ज्या दहशतवाद्यांनी आमच्या आया-बहिणींचं कुंकू पुसलं त्यांचा पूर्णपणे सर्वनाश करण्याचं काम या ऑपरेशनच्या माध्यमातून भारताने केले आहे. त्यामुळे या ऑपरेशनला अत्यंत समर्पक असं नाव देण्यात आलं असून ज्यांनी राफेल, तत्सम तंत्रज्ञानाची थट्टा केली अशा मुर्खांनाही या कारवाईने उत्तर मिळाले आहे. यांना उत्तर देण्याची आवश्यकता नाही, हे केवळ मुर्ख आहेत, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर केली.Operation Sindoor

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.