Operation Sindoor : भारताच्या सामरिक स्वातंत्र्याचे प्रतीक; भारत-पाक संघर्षाची अफगाणिस्तानच्या माजी उप-राष्ट्रपतींनी केली तुलना

भारताने 'Operation Sindoor' अंतर्गत पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधात कंबर कसली आहे. या ऑपरेशन अंतर्गत भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तानमधील दहशतवादी तळं, एअरबेस उडवून दिल्याची माहिती समोर आली.

41

भारताने ‘Operation Sindoor’ अंतर्गत पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधात कंबर कसली आहे. या ऑपरेशन अंतर्गत भारतीय सैन्यदलांनी पाकिस्तानमधील दहशतवादी तळं, एअरबेस उडवून दिल्याची माहिती समोर आली. त्यातच आता अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनी ट्विट केलं आहे. पाकिस्तानचा प्रत्येक इंच भारताच्या ताब्यात असून कुणाच्याही मदतीशिवाय भारताने तो भाग उद्ध्वस्त केल्याचे सालेह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, भारताच्या ‘Operation Sindoor’मुळे पाकिस्तानला लष्करी आणि राजनैतिकदृष्ट्या मोठा धक्का बसला. पाकिस्तानचे ऑपरेशन ‘बन्यान उल मरसूस’ हे केवळ प्रचार असल्याचे सिद्ध झाले, ज्याच्या विरुद्ध कोणतेही ठोस पुरावे नव्हते, असेदेखील माजी उप-राष्ट्रपती सालेह यांनी सांगितले. भारताच्या ऑपरेशन सिंदूरच्या यशाचे दाखलेच सालेह यांनी ट्विटच्या माध्यमातून जगासमोर मांडले आहेत.

(हेही वाचा India Pakistan War : एस – ४००, भटिंडा हवाई तळ नष्ट केल्याची दर्पोक्ती; खोटारड्या पाकचा भारताने फाडला बुरखा )

अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनी दि. ११ मे २०२५ रोजी भारत आणि पाकिस्तानमधील अलीकडच्या तणावाबाबत भारताच्या कारवाईला एक मोठे धोरणात्मक यश म्हटले आहे. ते म्हणाले की, भारताचे ‘ऑपरेशन सिंदूर’ हा स्पष्टपणे एक निर्णायक विजय होता आणि त्यानंतर झालेल्या युद्धबंदीने भारताचे राजनैतिक यश समोर आणले आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूरची तुलना पाकिस्तानच्या ऑपरेशन बन्यान उल मारसूसशी केली आहे.

भारताचे धोरणात्मक स्वातंत्र्य आणि आत्मविश्वास

अमरुल्लाह सालेह यांनी Operation Sindoor हे भारताच्या सामरिक स्वातंत्र्याचे प्रतीक असल्याचे वर्णन केले. सालेह म्हणाले की, यावेळी पहिल्यांदाच भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून (युएनएससी) परवानगी मागितली नाही आणि पाच महासत्तांकडे दुर्लक्ष केले. हा भारताच्या आत्मविश्वासाचा, सार्वभौमत्वाचा आणि स्वतंत्र विचारसरणीचा एक मजबूत संदेश होता. सालेह म्हणाले की भारताचा दृष्टिकोन स्पष्ट, अधिक स्वावलंबी आणि धोरणात्मकदृष्ट्या प्रभावी होता. त्यांनी भारताच्या धोरणाचे कौतुक केले असून त्याचे लष्करी आणि राजकीय निर्णय निर्णायक दाखवून देते. Operation Sindoor

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.