Operation Sindoor Delegation : शिवसेना उबाठा राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांचा ‘ऑपरेशन सिंदूर’ दौऱ्या(Operation Sindoor Delegation)त सहभाग असण्यावरून संजय राऊत यांची तीव्र नाराजी यामुळे उबाठात अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यानंतर आता उबाठाने संजय राऊताने घरचा आहेर दिला असून ऑपरेशन सिंदूरबाबत केंद्र सरकारच्या अभियानाला समर्थन दिले. केंद्र सरकारच्या शिष्टमंडळा(Operation Sindoor Delegation)ला उबाठा गटाने पाठिंबा दर्शविला असून संजय राऊतांच्या टीकेला पक्षाकडून केराची टोपली दाखविण्यात आली आहे.(Operation Sindoor Delegation)
(हेही वाचा ‘ऑपरेशन सिंदूर’वरून Shiv Sena UBT मध्ये वादाचा स्फोट? राऊत-चतुर्वेदी संघर्ष पुन्हा उफाळला! )
संजय राऊत काय म्हणाले होते?
लोकसभेत आमच्या पक्षाचे ०९ खासदार असून राष्ट्रवादी आणि शिंदे गटापेक्षा आमचा एक खासदार जास्त आहे. आमच्या पक्षातील खासदाराला शिष्टमंडळात समावेश करण्याआधी पक्षाला विचारणा केली का?, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला होता. ते पुढे म्हणाले होते की, एका शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची संधी आम्हाला मिळावयास हवी होती. पण सरकारने इथेही राजकारण केल्याचे स्पष्ट होते. परदेशात आपले हायकमिशन असताना शिष्टमंडळाची गरज काय होती? जगात हे प्रश्न घेऊन जात आहेत याचा अर्थ पंतप्रधान कमजोर आहेत, अशी टीका राऊतांनी केली होती.
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांचा उद्धव ठाकरेंशी संवाद
ऑपरेशन सिंदूरची माहिती जगभरात पोहोचविणाऱ्या केंद्र सरकारच्या अभियाना(Operation Sindoor Delegation)संदर्भात केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधल्याची माहिती पक्षाकडून ‘एक्स’वरील पोस्टच्या माध्यमातून देण्यात आली. केंद्र सरकारचे शिष्टमंडळ राजकारणाविरुद्ध नाही तर भारताविरुद्ध दहशतवादाविरुद्ध असून आपल्या देशहितासाठी जे आवश्यक असेल ते करु, असे सांगत जाहीर पाठिंबा दिला. खासदार प्रियंका चतुर्वेदी देशभरातील इतर खासदारांसह शिष्टमंडळाचा भाग असतील, असेही पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
The India delegations visiting various countries and SS UBT participation:
Union Minister Shri Kiren Rijiju ji had a telephonic call with Party President Shri Uddhav Thackeray ji, yesterday, with regards to this delegation.
This delegation is about India against terrorism, not…
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) May 20, 2025
दहशतवादाविरुद्ध कारवाई करणाऱ्या सशस्त्र दलांमध्ये आपण सर्वजण एक आहोत, याबद्दल कोणतेही दुटप्पी मत असू नये. आम्ही पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील पहलगाम ते ऑपरेशन सिंदूर यावर लवकरात लवकर चर्चा करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची विनंती केली आहे. दहशतवादाविरुद्धच्या लढाईत आम्ही एकजूट आहोत, अशी भूमिका उबाठा गटाकडून जाहीर करण्यात आली आहे.(Operation Sindoor Delegation)
Join Our WhatsApp Community