Operation Sindoor : हा नवा भारत आहे, आता अशा हल्ल्यांना कडक प्रत्युत्तर मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

84
Operation Sindoor : हा नवा भारत आहे, आता अशा हल्ल्यांना कडक प्रत्युत्तर मिळणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Operation Sindoor : हा नवा भारत आहे, आता अशा हल्ल्यांना कडक प्रत्युत्तर मिळणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

“पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवाद्यांच्या नऊ तळांचा भारतीय सेनेने यशस्वीपणे नाश केला आहे. पहलगाममध्ये (Pahalgam) ज्या क्रूरपणे आपल्या मायभगिनींना मारण्यात आलं, त्या घटनेचा संताप भारतीयांच्या मनात खोलवर होता. आजच्या ऑपरेशनमुळे संपूर्ण देशाला समाधान मिळालं आहे. आमच्या बहिणींचं कुंकू पुसणाऱ्या दहशतवाद्यांना पूर्णतः समाप्त करण्याचं काम भारताने केलं आहे,” अशा ठाम शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’वर (Operation Sindoor) प्रतिक्रिया व्यक्त केली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) पहिल्यापासूनच सांगितलं होतं की अशा घटना भारत सहन करणार नाही आणि त्याला योग्य उत्तर दिलं जाईल. आज आपल्या सेनेने अतिशय अचूकतेने व ताकदीनं ही कारवाई पार पाडली आहे. या ऑपरेशनला ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) हे नाव देण्यात आलं असून, त्यातून भारतीय सेनेच्या भावनिक आणि रणनैतिक निर्धाराचे दर्शन घडते.”

(हेही वाचा – भारतीय सेनेच्या शौर्याला शिवसेनेचा सलाम; उद्धव ठाकरे यांची Operation Sindoor वर प्रतिक्रिया)

हाफिज सईद व डेव्हिड हेडलीचे प्रशिक्षण तळही उद्ध्वस्त

फडणवीस यांनी यावेळी सांगितले की, “मुंबईवर हल्ला करणाऱ्या हाफिज सईद (Hafiz Saeed) आणि डेव्हिड हेडली (David Headley) यांना प्रशिक्षण देणारे तळही या कारवाईत उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. दहशतवादाच्या विरोधात भारताने मोठी लढाई उभी केली आहे. हा नवा भारत आहे. आता अशा हल्ल्यांना भारतकडून प्रत्यक्ष प्रत्युत्तर दिलं जातंय.”

राज ठाकरे यांच्या विधानावर ताशेरे

राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या युद्ध नको, थेट कारवाई करा या विधानावर विचारल्यावर फडणवीस म्हणाले, “राज ठाकरे काय म्हणतात याला काहीही महत्व नाही. आज संपूर्ण भारत आणि जागतिक समुदाय या कारवाईच्या समर्थनात उभा आहे. संपूर्ण देश आणि जग भारताच्या पाठिशी आहे.”

राफेलवर टीका करणाऱ्यांवर टिका

फडणवीस यांनी विरोधकांनाही टोला लगावत म्हटलं की, “राफेलवर शंका घेणारे हे मूर्ख लोक आहेत. ते देशासोबत विनोद करत आहेत. अशा लोकांना कोणतंही उत्तर देण्याची गरज वाटत नाही.”

महाराष्ट्रात अलर्ट जारी

या कारवाईच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही प्रशासन, पोलीस आणि सिव्हिल डिफेन्स यंत्रणा सतर्क असून, कोणत्याही परिस्थितीस तोंड देण्यासाठी राज्य सज्ज आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

या प्रतिक्रियेमधून मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी भारताच्या लष्करी कारवाईला संपूर्ण पाठिंबा दर्शवताना दहशतवादाच्या विरोधात कठोर आणि ठोस भूमिका घेतल्याचं स्पष्ट केलं आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.