Operation Sindoor : ‘या’ निमित्ताने भाजपा घरोघरी वाटणार सिंदूर !

91
Operation Sindoor : 'या' निमित्ताने भाजपा घरोघरी वाटणार सिंदूर !
Operation Sindoor : 'या' निमित्ताने भाजपा घरोघरी वाटणार सिंदूर !

ऑपरेशन सिंदूरची (Operation Sindoor) यशोगाथा घरोघरी पोहोचवण्यासाठी भाजपा महिलांना भेटवस्तू म्हणून सिंदूरचे (कुंकू) वाटप करणार आहे. भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, या मोहिमेला ९ जूनपासून सुरुवात होणार आहे. याच दिवशी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली होती. या मोहिमेचा मुख्य उद्देश मोदी ३.० सरकारच्या यशस्वी कामगिरीची उर्वरित ९ जूनपासून सुरू होणाऱ्या या अभियानामध्ये केंद्र सरकारमधील प्रत्येक मंत्री, एनडीएचे खासदार तसेच पक्ष संघटनेतील वरिष्ठ पदाधिकारी सहभागी होणार आहेत. (Operation Sindoor)

हेही वाचा-“अजित पवारांकडे नका बघू, थेट तक्रार घ्या!” ; Amit Shah यांचा भाजप आमदारांना ठणकावून सल्ला

एक महिना चालणाऱ्या या कार्यक्रमात सर्व लोकसभा खासदारांनी दररोज त्यांच्या मतदारसंघात १५ ते २० किमी पदयात्रा करायची आहे. मंत्र्यांनी आठवड्यातून दोन दिवस २० ते २५ किमीपर्यंत जनसंपर्कासाठी प्रवास करायचा आहे. (Operation Sindoor)

हेही वाचा- उत्तर कोरियाच्या हुकूमशाह किम जोंग उनची Donald Trump यांना धमकी ! कारण काय ?

1. जनसंपर्क अभियान: प्रत्येक विधानसभा क्षेत्रात हे अभियान २९ मे पर्यंत चालेल. बूथ स्तरावर (१+४) आणि (१+२) या सूत्रांनुसार कार्यकर्त्यांचा सहभाग (Operation Sindoor)
2. पत्रकार परिषद : २ जून ते ५ जून दरम्यान जिल्हास्तरावर पत्रकार परिषदांचे आयोजन होईल. राष्ट्रीय अध्यक्षांकडून ७ किंवा ८ जून रोजी दिल्लीत पत्रकार परिषद होईल.
3. प्रोफेशनल्स मीट: प्रत्येक जिल्ह्यात व्यावसायिकांची बैठक.यात तीन महत्त्वाच्या धोरणात्मक विषयांवर चर्चा केली जाईल.
4.विकसित भारत संकल्प सभा: प्रत्येक मंडळात “विकसित भारत संकल्प सभा” आयोजित केली जाणार आहे.
5. पंचायत चौपाल: शहरांतील मोहल्ला व गावांतील पंचायत चौपालच्या माध्यमातून सरकारच्या योजनांची माहिती दिली जाईल.
6. आयुष्मान भारत शिबिर: प्रत्येक विधानसभा क्षेत्रात नोंदणीसाठी शिबिरे. प्रत्येक जिल्ह्यात किमान १०० लाभार्थींचा सहभाग आवश्यक असेल.
7. डिजिटल स्पर्धा : व्हिडिओ व ग्राफिक्सशी संबंधित डिजिटल स्पर्धांचे आयोजन केले जाईल.
8. प्रदर्शनांचे आयोजन: सर्व जिल्ह्यांमध्ये आणि जिल्हा केंद्रांवर सरकारी योजनांची प्रदर्शने आयोजित केली जातील.
9. योग दिवस: १५ जून ते २० जून दरम्यान योग प्रशिक्षण शिबिरे होतील. (Operation Sindoor)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.