One Nation, One Election लागू होणार ?; काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी

One Nation, One Election पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'वन नेशन,वन इलेक्शन'वर भाष्य केले आहे. जर 'वन नेशन, वन इलेक्शन' अंमलात आणू शकलो, तर देशाला खूप फायदा होईल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

119
One Nation, One Election लागू होणार ?; काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी
One Nation, One Election लागू होणार ?; काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी

वन नेशन वन इलेक्शन (One Nation, One Election) ही आमची कटीबद्धता आहे. यासंदर्भात आम्ही संसदेमध्येही चर्चा केली. याबाबत आम्ही एक समितीही स्थापन केली होती. या समितीचा अहवालही आलेला आहे. या अहवालामध्ये अनेकांनी सकारात्मक आणि नाविन्यपूर्ण सूचना केल्या आहेत. जर आम्ही हा अहवाल अंमलात आणू शकलो, तर देशाला खूप फायदा होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केले आहे. ते ‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

(हेही वाचा – Monsoon Update : यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस ?; जाणून घ्या ‘एल निनो’ आणि’ला निना’चा परिणाम…)

अनेक दिवसांपासून चालू आहे चर्चा

देशात ‘वन नेशन, वन इलेक्शन’च्या मुद्यांवर अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावरून अनेक आरोप-प्रत्यारोपदेखील झाले आहेत. ‘वन नेशन, वन इलेक्शन’वरून विरोधकांनी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. काही दिवसांपूर्वी ‘वन नेशन, वन इलेक्शन’बाबतचा एक अहवाल माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीने सरकारकडे दिला. यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘वन नेशन,वन इलेक्शन’ मुद्यांवर भाष्य केले आहे.

युक्रेनमध्ये युद्ध (Russo-Ukrainian War) सुरु होते, त्या वेळच्या मुद्यांवरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केले. “भारतातील विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे आपल्या देशात आणण्यात आल्याचे सांगत ही एक मन हेलावणारी घटना होती”, असे पंतप्रधान म्हणाले.

२२०० कोटी रुपये जप्त

देशभरात केल्या जाणाऱ्या ईडी कारवाईविषयीही पंतप्रधान मोदी यांनी या वेळी आकडेवारी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “ईडीच्या कारवाईमध्ये ९७ टक्के अराजकीय व्यक्तींवर कारवाई झाली आणि फक्त तीन टक्के राजकीय लोकांवर कारवाई झाली. ईडीने गेल्या १० वर्षात २२०० कोटी कॅश जप्त केले. मात्र २०१४ सालच्या आधी फक्त ३४ लाख रुपये कॅश जप्त केले होते.” (One Nation, One Election)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.