Omar Abdullah यांचे विमान दिल्ली ऐवजी पोहचले राजस्थानला !

दिल्लीत लँडिंग स्पेस नसल्यामुळे झाला मनस्ताप

111
Omar Abdullah यांचे विमान दिल्ली ऐवजी पोहचले राजस्थानला !
Omar Abdullah यांचे विमान दिल्ली ऐवजी पोहचले राजस्थानला !

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला (Omar Abdullah) यांना विमान कंपनीच्या गैरव्यवस्थापनाचा चांगलाच फटका बसला. अब्दुल्ला जम्मूहून दिल्लीसाठी निघाले होते. परंतु, दिल्लीत विमानांची गर्दी असल्यामुळे त्यांचे विमान राजस्थानच्या जयपूर येथे लँड करावे लागले. त्यामुळे संतप्त झालेल्या अब्दुल्लांनी रात्री 1 वाजता ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. (Omar Abdullah)

जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला शनिवारी रात्री इंडिगोच्या विमानाने दिल्लीला दिल्लीला निघाले होते. परंतु दिल्ली विमानतळावर विमानांची गर्दी असल्याने विमान उतरण्यासाठी जागा उपलब्ध नव्हती. त्यामुळे विमान दिल्लीत उतरू शकले नाही आणि विमान थेट जयपूरला वळवण्यात आले. तिथे रात्री उशिरा 1 वाजता विमान पोहचले. (Omar Abdullah)

हेही वाचा-Umred : आकाशातून कोसळला 50 किलोचा तुकडा; UFO की विमानाचा भाग ?

विमानातून उतरल्यानंतर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा पारा चढला. त्यांनी एक सेल्फी शेअर करत सोशल मीडियावरून संतप्त भावना व्यक्त केल्या. “दिल्ली विमानतळ म्हणजे एक संपूर्ण गोंधळाची परिस्थिती आहे. जम्मूहून निघाल्यानंतर 3 तास हवेत फिरवून आम्हाला जयपूरला वळवले. आता मी विमानाच्या जिन्यावर उभा राहून थोडी ताजी हवा घेत आहे. इथून कधी निघणार, काहीच कल्पना नाही.” असे अब्दुल्ला यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. (Omar Abdullah)

हेही वाचा- Election Commission : 22 कोटी मतदार ‘आधार’शी लिंक नाहीत ; आता घरोघरी जाऊन होणार पडताळणी

दरम्यान, शनिवारी श्रीनगर विमानतळावर खराब हवामानामुळे 6 विमाने रद्द करण्यात आली होती. यामुळे जम्मू विमानतळावरही अनेक प्रवासी अडकले होते. तिथे विमानांच्या उड्डानांना विलंब व रद्द होण्याच्या प्रकारांमुळे पूर्ण गोंधळाचे वातावरण होते. त्यामुळे शेकडो प्रवासी अडकल्यामुळे परिस्थिती अधिकच बिघडली होती. (Omar Abdullah)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.