आता १५० दिवसांचा दुसरा कृती आरखडा जाहीर; CM Devendra Fadnavis यांची चौंडीत घोषणा

46
आता १५० दिवसांचा दुसरा कृती आरखडा जाहीर; CM Devendra Fadnavis यांची चौंडीत घोषणा
आता १५० दिवसांचा दुसरा कृती आरखडा जाहीर; CM Devendra Fadnavis यांची चौंडीत घोषणा

विकसित महाराष्ट्र, ई-गव्हर्नन्स विषयक सुधारणा आणि सेवा विषयक प्रशासकीय सुधारणा या तीन बाबींवर आधारित १५० दिवसांचा दुसरा कृती आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी मंगळवारी चोंडी (जि. अहिल्यानगर) येथे जाहीर केला. या कृती आराखड्याचा तपशील आज, बुधवारी जाहीर केला जाणार आहे.

चोंडी (Chondi) येथे आयोजित राज्य मंत्रिपरिषदेच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी १५० दिवसांच्या नव्या कार्यक्रमाची घोषणा केली. १०० दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा आणि धोरणात्मक बाबींवर आधारित कार्यक्रमास अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. राज्यातील १२ हजार ५०० शासकीय कार्यालये या कार्यक्रमात सहभागी झाली. मंत्रालयातील ४८ विभाग या कार्यक्रमात सहभागी झाले. या विभागातील ९०२ विषयांवर धोरणात्मक निर्णय घेणे अपेक्षित असताना ७०६ विषयांवर आधारित निर्णय घेऊन आवश्यक बदल करण्यात आले. यामध्ये काही धोरणात्मक बदल करण्यात आले तर काही प्रक्रियात्मक बदल करण्यात आले. या कार्यक्रमास मिळालेल्या चांगल्या प्रतिसादामुळे १५० दिवसांच्या कार्यक्रमाची सुरुवात आजपासून २ ऑक्टोबर २०२५ पर्यंत सुरू राहील, अशी माहिती फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी यावेळी दिली.

(हेही वाचा – Ahilyadevi Holkar : अद्ययावत तंत्रज्ञानाने निर्मित जीवनपट लवकरच रुपेरी पडद्यावर)

विकसित महाराष्ट्र, ई-गव्हर्नन्स विषयक सुधारणा आणि सेवा विषयक प्रशासकीय सुधारणा या तीन बाबींवर हा कार्यक्रम आधारित असेल. विकसित महाराष्ट्र मुद्यांवर २०२९, २०३५ आणि २०४७ अशा तीन टप्प्यांत विभागाचे धोरण काय असेल याबाबत परिमाण निश्चित करण्याचे फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले. १०० दिवसांच्या कार्यक्रमांतून प्रशासकीय सुधारणा करण्यासाठी प्रयत्न झाले. आता नागरिकांना आधिक चांगली सेवा देण्यासाठी हा १५० दिवसांचा कार्यक्रम आखला आहे. या कार्यक्रमातून शासकीय यंत्रणेत आणखी सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, असेही फडणवीस यांनी सांगितले. १०० दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमात उस्फूर्त सहभाग दाखविल्याबद्दल सर्व मंत्री आणि सचिवांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.