
ईशान्येकडील (Northeast floods) राज्यांमध्ये मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर होत चालली आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी आसाम, अरुणाचल आणि सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांशी आणि मणिपूरच्या राज्यपालांशीही फोनवरून चर्चा केली. केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन राज्यांना दिले. (Northeast floods)
Incessant rains across Mizoram, Arunachal Pradesh, Sikkim, and Eastern Bhutan have triggered landslides, road blockages, and communication blackouts. @BROindia has responded with unmatched urgency—clearing debris in Mizoram, restoring access in Sikkim, keeping the… pic.twitter.com/0iXly3IFOt
— Ministry of Defence, Government of India (@SpokespersonMoD) June 3, 2025
आसामच्या १५ हून अधिक जिल्ह्यांमध्ये ७८ हजारांहून अधिक लोक प्रभावित झाले आहेत. त्रिपुरामध्ये १३०० कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. ईशान्य भारतात विविध ठिकाणी पावसाशी संबंधित घटनांमध्ये आतापर्यंत ३६ जणांचा बळी गेला असून साडेपाच लाखांपेक्षा जास्त लोकांना पुराचा फटका बसला आहे. (Northeast floods)
VIDEO | Manipur: The flood situation in Manipur has worsened as more than 1.64 lakh people were affected by the calamity, after several rivers overflowed and breached embankments following heavy rainfall in the state, officials said. The body of a person who was washed away in… pic.twitter.com/BUOvWrRVVU
— Press Trust of India (@PTI_News) June 4, 2025
मणिपूरमध्ये मुसळधार पावसामुळे गेल्या ४८ तासांत पूर आणि भूस्खलनामुळे ३,८०२ लोक प्रभावित झाले आहेत. ८८३ घरांचे नुकसान झाले आहे. उत्तर सिक्कीममध्ये सुमारे १५०० पर्यटक अडकले आहेत. रस्त्यावर डोंगरांचे ढिगारे साचले असल्याने रस्ता बंद करण्यात आला आहे. प्रशासन आणि बचाव पथके ढिगारा काढण्यात गुंतली आहेत. (Northeast floods)
The officer standing ankle deep in sludge, has been doing this for nearly 40 plus hours now, leading the rescue efforts and is present everywhere personally. And he’s a Brigadier, boss of the HQ that was hit by landslide in Sikkim. He didn’t go and sit in his office and asked for… pic.twitter.com/XV1KbbHFZZ
— Maj Manik M Jolly,SM (@Manik_M_Jolly) June 3, 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिस्वा सरमा आणि सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच त्यांनी मणिपूरचे राज्यपाल अजय भल्ला यांच्याकडूनही तेथील परिस्थितीची माहिती घेतली. (Northeast floods)
A short while ago, Hon’ble Prime Minister Shri @narendramodi ji called me to enquire about the current flood situation in Assam.
I briefed him on how continuous rainfall in Assam and adjoining states has led to flooding and impacted many lives. I also apprised him of the relief…
— Himanta Biswa Sarma (@himantabiswa) June 3, 2025
मिझोरममध्ये १० दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे तेथील परिस्थिती बिकट झाली आहे. भूस्खलनाच्या ५५२ घटना घडल्या आहेत. तसेच १५२ घरांचे पूर्ण किंवा अंशत: नुकसान झाले असल्याची माहिती राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसन विभागाने मंगळवारी दिली. मिझोराममधील ११ जिल्ह्यांपैकी म्यानमारला लागून असलेल्या चम्फाई जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. तिथे २०९ ठिकाणी भूस्खलन झाले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. (Northeast floods)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community