भारत सरकारने पाकिस्तानमध्ये (Pakistan) बनवलेल्या किंवा पाकिस्तानमधून निर्यात केलेल्या कोणत्याही उत्पादनांच्या आयात आणि निर्यातीवर बंदी घातली आहे. हा आदेश तात्काळ प्रभावाने लागू करण्यात येत आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (DGFT) २ मे २०२५ रोजी एक अधिसूचना जारी केली.
India bans imports or transit of all goods originating in or exported from Pakistan pic.twitter.com/BNt7abHgiP
— IANS (@ians_india) May 3, 2025
राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक धोरणात्मक बाबी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. भारताने स्पष्ट केले आहे की, ते यापुढे पाकिस्तानसोबत (Pakistan) कोणत्याही प्रकारची भागीदारी ठेवणार नाही. हा प्रभाव अंमलात आणण्यासाठी परराष्ट्र व्यापार धोरण (FTP) २०२३ मध्ये एक तरतूद जोडण्यात आली आहे. ज्या अंतर्गत पुढील आदेशापर्यंत पाकिस्तानमधून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष आयातीवर बंदी राहील. २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने हा निर्णय घेतला आहे. भारताने सिंधू पाणी करारही स्थगित केला आहे. (Pakistan)
Join Our WhatsApp Community