अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि टेस्लाचे मालक इलॉन मस्क यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मला मस्कशी संबंध सुधारण्याची कोणतीही इच्छा नाही, असं ट्रम्प यांनी शनिवारी (दि.७) स्पष्ट केले. यासोबतच त्यांनी मस्क यांना गंभीर इशाराही दिला. जर मस्क यांनी येत्या निवडणुकीत डेमोक्रॅट्सना मदत करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असंही ट्रम्प यांनी म्हटलं. (Donald Trump)
हेही वाचा-आयपीएल २०२६ हंगामासाठी RCB वर बंदीची टांगती तलवार !
डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मस्क यांना आता उघडपणे इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी मस्कबद्दल विचारही करत नसल्याचे म्हटले आहे. मीडियाशी बोलताना ट्रम्प यांनी मी काही काळ मस्कशी बोलणारही नाही, असं म्हटलं आहे. माझ्या मदतीशिवाय ट्रम्प यांनी निवडणूक जिंकली नसती, असं मस्क यांनी म्हटलं होतं. ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटीफुल बिल’ ला पैशाचा अपव्यय म्हणत इलॉन मस्क सरकारमधून बाहेर पडले होते. मस्क यांच्या टीकेवर सुरुवातीला ट्रम्प यांनी मौन बाळगलं होतं. त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार दिला आहे.
हेही वाचा- Ratnagiri Accident : मुंबई-गोवा महामार्गावर मिनी बस आणि LPG टँकरचा भीषण अपघात ! वाहतूक ठप्प
तसेच जर मस्क यांनी कर कपात विधेयकाच्या बाजूने मतदान करणाऱ्या रिपब्लिकन उमेदवारांविरुद्ध निवडणूक लढवण्यासाठी डेमोक्रॅटिक उमेदवारांना आर्थिक मदत केली तर त्याचे अतिशय गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा ट्रम्प यांनी मुलाखतीमध्ये दिला. “जर त्यांनी असे केले तर त्याला खूप गंभीर परिणाम भोगावे लागतील,” असं ट्रम्प म्हणाले. (Donald Trump)
हेही वाचा- Gadchiroli Elephant : गडचिरोलीत 23 हत्ती तळ ठोकून ! आनंदाची बाब की चिंता वाढवणारी गोष्ट ?
इलॉन मस्क यांच्यासोबतचे तुमचे संबंध संपल्याचे वाटते का असं विचारले असता, ट्रम्प यांनी, “हो, मलाही तसेच वाटते,” असं म्हटलं. लवकरच मस्कशी बोलण्याची माझी कोणतीही योजना नसल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले. ‘मी इतर गोष्टींमध्ये खूप व्यस्त आहे, माझा त्यांच्याशी बोलण्याचा कोणताही हेतू नाही,’ असंही ट्रम्प म्हणाले. (Donald Trump)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community