Nitin Gadkari: भाजपाच्या पहिल्या यादीत नितीन गडकरींचे नाव नाही, राजकीय वर्तुळात चर्चा

253
Nitin Gadkari: भाजपाच्या पहिल्या यादीत नितीन गडकरींचे नाव नाही, नागपूर आणि महाराष्ट्रातील नेत्यांना धक्का
Nitin Gadkari: भाजपाच्या पहिल्या यादीत नितीन गडकरींचे नाव नाही, नागपूर आणि महाराष्ट्रातील नेत्यांना धक्का

भारतीय जनता पक्षाने जाहीर केलेल्या लोकसभा उमेदवारांच्या पहिल्या यादीत केंद्रीय मंत्रिमंडळात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह पहिल्या फळीतील भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचे नाव नाही. त्यांची पक्षातील ज्येष्ठता पाहता त्यांचा पहिल्या यादीत समावेश अपेक्षित होता, मात्र यादीत नाव नसल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा आणि तर्कवितर्क सुरू आहेत.

पक्षाच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील एकाही उमेदवारांचा समावेश नाही, राज्यात महायुतीचे सरकार आहे. त्यांचे जागावाटप अद्याप अंतिम झाले नाही. त्यामुळे गडकरीच नव्हे, तर महाराष्ट्रातील एकाही जागेवरील उमेदवार जाहीर केला नाही, असे पक्षाकडून सांगितले जात आहे, मात्र पक्षाने ‘अ’ आणि ‘ड’ वर्गातील उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यात भाजपा नेते नितीन गडकरी यांचेही नाव पहिल्या यादीत नसल्याने नागपूर आणि महाराष्ट्रातील नेत्यांना धक्का बसणारी बाब आहे. नागपूरची जागा ‘अ’ वर्गात आहे, मग गडकरींचे नाव त्यात का समाविष्ट केले गेले नाही. पहिल्या यादीत त्यांचे नाव असते, तर राज्यातील कार्यकर्त्यांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगला संदेश गेला असता, अशी चर्चा भाजपामध्ये सुरू आहे.

(हेही वाचा – Navneet Rana : आम्ही योग्य वेळी योग्यच निर्णय घेऊ)

गडकरी राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आहेत. मागील १० वर्षांत त्यांचा नावलौकिक आहे. २०१४ आणि २०१९ या दोन्ही लोकसभा निवडणुकीत गडकरी यांनी नागपूरमधून प्रचंड मताधिक्क्याने विजय मिळवला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (State President Chandrasekhar Bawankule) यांनी शनिवारी सकाळी पत्रकार परिषदेतही गडकरी हेच उमेदवार असतील, असे स्पष्ट सांगितले होते, मात्र सायंकाळी पक्षाने जाहीर केलेल्या १९५ उमेदवारांच्या पहिल्या यादीत गडकरी यांच्या नावाचा समावेश नव्हता.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.