Nitin Gadkari : विदर्भाची बलस्थाने ओळखून विकास करणार

राष्ट्रीय औद्योगिक महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी (२७ जानेवारी) दुपारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी गडकरी म्हणाले की, "रस्ते, वीज, पाणी आणि संपर्क सुविधा या औद्योगिक विकासासाठी महत्वाच्या असतात. विदर्भ हे या सर्व बाबतीत स्वयंपूर्ण होत असून समृद्धी महामार्गसारखे प्रक्पल विदर्भात गुंतवणूक आकर्षित करतील असा माझा विश्वास आहे."

134
Nitin Gadkari : विदर्भाची बलस्थाने ओळखून विकास करणार

विदर्भाच्या औद्योगिक, कृषी आणि अन्य क्षेत्रांचा विकास साधायचा असेल तर पायाभूत सुविधा बळकट करणे आवश्यक आहे. त्यासाठी रस्त्यांचा विकास करण्यात येत आहे जेणेकरून मोठ्या उद्योगांसाठी दळणवळण सुविधा उपलब्ध होऊ शकेल. याशिवाय विदर्भाची बलस्थाने ओळखून विकास करणार असल्याचे प्रतिपादन (Nitin Gadkari) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. गडकरी यांच्याच संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार औद्योगिक महोत्सव -ऍडव्हान्टेज विदर्भच्या प्रसंगी ते उपस्थितांना संबोधित करीत होते.

(हेही वाचा – Defense Sector of India : संरक्षण क्षेत्रात भारत आत्मनिर्भरतेच्या दिशेने

राष्ट्रीय औद्योगिक महोत्सवाचे उद्घाटन –

असोसिएशन फॉर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट तर्फे स्थानिक नागपूर विद्यापीठाच्या अमरावती रोड परिसरात आयोजित ३ दिवसीय राष्ट्रीय औद्योगिक महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी (२७ जानेवारी) दुपारी (Nitin Gadkari) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी गडकरी म्हणाले की, “रस्ते, वीज, पाणी आणि संपर्क सुविधा या औद्योगिक विकासासाठी महत्वाच्या असतात. विदर्भ हे या सर्व बाबतीत स्वयंपूर्ण होत असून समृद्धी महामार्गसारखे प्रक्पल विदर्भात गुंतवणूक आकर्षित करतील असा माझा विश्वास आहे. ऍडव्हान्टेज विदर्भ हा प्रदर्शन व महोत्सव यावर्षी प्रथमच होत आहे, यातून अभ्यास करुन काही सुधारणा पुढील वर्षी करण्यात येतील आणि त्यात प्रत्येक जिल्ह्याचे स्वतंत्र पॅव्हेलियन असेल व त्यातून त्या जिल्ह्याची माहिती, उपलब्धता आणि विकासाला असलेला वाव यांचे दर्शन होईल अशी माहिती गडकरी (Nitin Gadkari) यांनी दिली.

(हेही वाचा – Indian Army: प्रीती रजक बनल्या भारतीय सैन्यातील पहिल्या महिला सुभेदार, कसा होता ‘हा’ प्रेरणादायी प्रवास; वाचा सविस्तर…)

विविध क्षेत्रातील मान्यवर तज्ञ उपस्थित –

यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, खासदार प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची समयोचित विषयानुरूप भाषणे झाली. या कार्यक्रमात एएआर इंदेमार आणि नागपुरातील झुलेलाल इन्स्टिट्यूट, प्रियदर्शनी कॉलेज व नागपूर विद्यापीठ यांच्यात अध्ययन अध्यापनासाठी सामंजस्य करार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर व डॉ. बिंदू चिमोटे यांनी केले. आभारप्रदर्शन एडचे सचिव डॉ. विजय शर्मा यांनी केले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर तज्ञ उपस्थित होते. (Nitin Gadkari)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.