‘दगड मारणारेच भाजपामध्ये आणि वार्ड अध्यक्षही’; Nitin Gadkari यांच्या नागपूरमधील विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा

149
'दगड मारणारेच भाजपामध्ये आणि वार्ड अध्यक्षही'; Nitin Gadkari यांच्या नागपूरमधील विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा
  • प्रतिनिधी

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या नागपूरमधील एका श्रद्धांजली सभेत केलेल्या विधानाने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडवली आहे. ‘जे लोक पूर्वी भाजपा आणि संघाच्या कार्यकर्त्यांवर दगडफेक करायचे, तेच आता भाजपामध्ये आले आहेत आणि त्यातील एकजण तर वार्ड अध्यक्षही झाला आहे,’ असे गडकरींनी ठामपणे सांगितले.

(हेही वाचा – Virat Kohli : इंग्लंडच्या काऊंटीकडून विराटला निवृत्तीवरून डिवचणारा व्हिडिओ)

नागपूरच्या मुंडले इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये भाजपाचे माजी आमदार व संघटक डॉ. रामदास आंबटकर यांच्या श्रद्धांजली सभेत गडकरी (Nitin Gadkari) बोलत होते. आपल्या भाषणात त्यांनी भाजपाच्या संघर्षाच्या काळातील आठवणींना उजाळा देताना ‘आज अनुकूल काळ आहे. काळ बदलला आहे,’ असे नमूद करत आपल्या अनुभवांवर आधारित किस्सा सांगितला. १९७५ च्या आणीबाणीच्या काळात भाजपा आणि संघ कार्यालयावर दगडफेक करणारेच आता भाजपामध्ये सामील झाले आहेत, असे सांगत त्यांनी पक्षातील बदललेल्या राजकीय समीकरणांना अधोरेखित केले.

(हेही वाचा – Operation Sindoor : ‘रामचरितमानस’चा संदर्भ, समझदारों को इशारा…; सैन्यदलांची झंझावाती पत्रकार परिषद)

गडकरी (Nitin Gadkari) यांनी, ‘ज्यांनी आपल्यासाठी विजय मिळवून दिला, त्यांना कधीही विसरू नये. डॉ. रामदास आंबटकर यांसारख्या कार्यकर्त्यांनी कठीण परिस्थितीत संघर्ष केल्यामुळेच आज भाजपाला यशाचे दिवस पाहता आले आहेत,’ असेही भावनिक उद्गार काढले. यावेळी मंचावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, तसेच संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकरही उपस्थित होते. गडकरी यांच्या या वक्तव्यानंतर भाजपामध्येच अंतर्गत गटबाजी आणि नव्या नेतृत्वाच्या स्वीकाराच्या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.