“मशिदीत जर हा प्रकार घडला असता, तर …” ; पौड प्रकरणावर Nitesh Rane यांचा संताप

"मशिदीत जर हा प्रकार घडला असता, तर ..." ; पौड प्रकरणावर Nitesh Rane यांचा संताप

100
"मशिदीत जर हा प्रकार घडला असता, तर ..." ; पौड प्रकरणावर Nitesh Rane यांचा संताप

पुण्यातील पौड (ता. मुळशी) येथे मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नागेश्वर मंदिरात असलेल्या अन्नपूर्णा देवीच्या मुर्तीची चाँद नौशाद शेख (वय 19, रा. पौड) याने विटंबना केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या घटनेने गावामध्ये सध्या संतापाची लाट पसरली आहे. अन्नपूर्णा देवीच्या मुर्तीची विटंबना केल्याच्या प्रकरणी आता मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा-India-Pakistan War : कुठल्या जिल्ह्यात मॉकड्रील होणार ? सायरन वाजल्यावर काय कराल? सायरन कुठे लागणार? वाचा सर्व काही एका क्लिकवर …

“मशिदीत जर हा प्रकार घडला असता, तर महाराष्ट्र शांत राहिला असता का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. पुणे विभागातील मत्स्य व्यवसाय विभागाच्या सोमवारी (दि. ६) आढावा बैठकीनंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते. राणे म्हणाले, “आरोपी अल्पवयीन मुलाच्या वडिलांशी बोलणी करण्यासाठी आमचे कार्यकर्ते गेले असता, त्यांनी जे उत्तर दिले, त्यावरून लक्षात येते की बापाच्या विचारांवर मुलगा कसा आहे. अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी हिंदू समाजाने आम्हाला सत्तेत बसविले आहे,” असा इशारा त्यांनी यावेळी दिला. (Nitesh Rane)

हेही वाचा- देशाच्या सर्वोच्च न्यायमूर्तींकडे किती संपत्ती? Supreme Court कडून संपत्ती जाहीर

“राज्यात तारापूर, नागपूर आणि पुणे येथे मत्स्यालय सुरू करण्यात येणार असून, पुण्यातील मत्स्य विभागाच्या हडपसर येथी १६ एकर जागेत मत्स्यालय उभारता येऊ शकते का, याबाबत चर्चा झाली,” अशी माहिती माहिती राणे यांनी दिली. मत्स्य उत्पादनवाढीसाठी अधिकाऱ्यांना उद्दिष्ट देण्यात आली आहेत. तसेच सध्याच्या मासळी बाजारांच्या स्थितीबाबतही चर्चा झाल्याचे ते म्हणाले. (Nitesh Rane)

हेही वाचा- India-Pakistan War : ७ मे ला देशात ‘मॉक ड्रिल’ आदेश ; याआधी केव्हा करण्यात आले होते ?

“तलावांच्या ठेकेदारांनी उत्पादनावर पुरेसे लक्ष दिलेले नाही. ठेकेदार काम करतो आहे की नाही, हे देखील तपासले जाईल. मत्स्य विभागात कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटलायझेशन आणि पारदर्शकता आणली जाईल आणि उत्पादन वाढीसाठी विविध उपाययोजना केल्या जातील,” अशी माहिती राणे यांनी दिली. उजनी धरण जलसंपदा मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. मंत्रालय स्तरावर बैठक घेऊन या धरणाची जबाबदारी मत्स्य खात्याकडे देण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Nitesh Rane)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.