Maratha Reservation :दगडफेकीच्या मास्टरमाईंडमागे कुणाचा हात ? नितेश राणेंकडून तो फोटो शेअर

अंतरवली सराटी मध्ये सप्टेंबर महिन्यात दगडफेक आणि जाळपोळ झाली होती. या आंदोलनाच्या पाठीमागे कोण आहे? अशा अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत.

113
Maratha Reservation :दगडफेकीच्या मास्टरमाईंडमागे कुणाचा हात ? नितेश राणेंकडून तो फोटो शेअर
Maratha Reservation :दगडफेकीच्या मास्टरमाईंडमागे कुणाचा हात ? नितेश राणेंकडून तो फोटो शेअर

अंतरवली सराटीतील दगडफेक करणारा मुख्य आरोपी हृषीकेश बदरेनी शरद पवार, राजेश टोपेंची भेट घेतली. १ सप्टेंबर रोजी पोलीसांवर दगडफेक तर ३ सप्टेंबर रोजी शरद पवारांसोबत भेट झाली. पवार साहेब पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कुणी रचला? महाराष्ट्राला कोण अशांत करतंय?, असं म्हणत नितेश राणे यांनी हल्लाबोल केला आहे. (Maratha Reservation)

अंतरवली सराटी मध्ये सप्टेंबर महिन्यात दगडफेक आणि जाळपोळ झाली होती. या आंदोलनाच्या पाठीमागे कोण आहे? अशा अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. याच संदर्भात भाजप नेते नितेश राणे यांनी एक्सवर एक फोटो शेअर करत गंभीर आरोप केले आहेत. राणे यांनी अंतरवली सराटीतील मुख्य आरोपी हृषीकेश बदरे याच्यासोबतचा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मंत्री राजेश टोपे यांचा फोटो शेअर केला आहे. अंतरवली सराटी येथे झालेल्या हल्ल्यामागे मास्टरमाईंड कोण असा थेट सवाल त्यांनी केला आहे.नितेश राणे म्हणाले, 1 सप्टेंबर पोलीसांवर दगडफेक तर तीन सप्टेंबर रोजी शरद पवारांसोबत भेट झाली. पवार साहेब पोलिसांवर दगडफेक करण्याचा कट नेमका कुणी रचला? महाराष्ट्राला कोण अशांत करतंय? (Maratha Reservation)

(हेही वाचा : Loksabha Election 2024: जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, फडणवीसांनी सांगितला आकडा)

लाठीचार्जबद्दल दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरु
अंतरवली सराटी येथे झालेल्या दगडफेक प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे. बेदरे याच्याकडे एक गावठी पिस्तुल सापडल्याचाही दावा करण्यात आला आहे. मराठा आंदोलनाच्यावेळी पोलिसांवर दगडफेक केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. याप्रकरणी अन्य दोघांना अटक केल्याची माहिती आहे. अंतरवली सराटीत जरांगे पाटलांचं उपोषण सुरु असताना पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. या लाठीचार्जमध्ये अनेक मराठा आंदोलक आणि पोलीसही जखमी झाले होते. पण या लाठीचार्जबद्दल दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. जालन्यात पोलिसांनीच आमच्यावर हल्ला केला असा आरोप जरांगे पाटील करत आहेत. तर आंदोलकांनीच पोलिसांवर दगडफेक केल्याचा आरोप दुसऱ्या बाजूकडून करण्यात येत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.