Congress : विरोधकांची पुढची बैठक होणार मुंबईत

83

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांपासून ते सत्ताधाऱ्यांपर्यंत सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. २३ जून रोजी विरोधकांची बिहारच्या पाटणा येथे पहिली बैठक पार पडली. या बैठकीला देशातले १६ पक्ष एकत्र आले होते. त्यानंतर १७, १८ जुलै रोजी कर्नाटकच्या बंगळुरू येथे विरोधकांची दुसरी बैठक पार पडली. यावेळी देशातील २६ विरोधी पक्ष एकत्र जमले होते. महाराष्ट्रातून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार या बैठकीला उपस्थित होते. तिसरी बैठक महाराष्ट्रातील मुंबईत होणार आहे.

या बैठकीत विरोधकांच्या या आघाडीचे नाव ठरवण्यात आले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या आघाडीला ‘इंडिया’ (INDIA) असं नाव देण्यात आलं आहे. India या संक्षिप्त रुपाचा पूर्ण अर्थ (फुल फॉर्म) इंडियन नॅशनल डेमोक्रेटिक इन्क्लुझिव्ह अलायन्स (Indian National Democratic Inclusive Alliance) असं आहे. यावेळी मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं की, आमची २६ पक्षांची एकजूट पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएची बैठक बोलावली आहे. यात त्यांनी ३० पक्षांना बोलावलं आहे. हे ३० पक्ष कुठले आहेत, तेच माहिती नाही. त्यांनी कोणाला बोलावलंय ते माहिती नाही. हे पक्ष निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत आहेत की नाही तेसुद्धा कोणाला माहिती नाही. मोदीजी आता प्रत्येक पक्षाशी संपर्क साधत आहेत. त्या त्या पक्षाच्या अध्यक्षांशी बोलत आहेत. कारण नरेंद्र मोदी विरोधकांना घाबरले आहेत.

(हेही वाचा Veer Savarkar : पोर्ट ब्लेअरमधील वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाले उद्घाटन)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.