चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये नवा ट्वीस्ट; दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या भावाने भरला उमेदवारी अर्ज

145

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीनंतर आता कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. पोटनिवडणुकीसंदर्भात नवनवीन घडामोडी घडताना दिसत आहे. तसेच भाजप आणि मुख्यमंत्र्यांकडून पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीतील नेत्यांना आग्रह धरला जात आहे. दरम्यान सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. भाजपकडून चिंचवडमधून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांची पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी दिली आहे. तर कसबा पेठेतून हेमंत नारायण रासने यांना उमेदवारी दिली आहे. सोमवारी या दोन्ही उमेदवारांनी अर्ज भरला आहे. पण दुसरीकडे जगताप यांचे भाऊ शंकर जगताप यांनी सुद्धा अर्ज भरल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चिंचवड पोटनिवडणुकीत मोठा ट्विस्ट आला असून एकच खळबळ उडाली आहे.

सोमवारी मोरया गोसावीचं दर्शन घेऊन भाजपकडून अश्विनी जगताप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपकडून जोरदार प्रचार करण्यात आला. पण यादरम्यान दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे भाऊ शंकर जगताप यांनी देखील अर्ज भरल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पण शंकर जगतापांचा अर्ज डमी असल्याचे स्पष्टीकरण भाजप नेत्यांकडून देण्यात आले आहे.

(हेही वाचा – ..तर जितेंद्रचा जितुद्दीन, अजितचा अजरुद्दीन, शरदचा समशुद्दीन झाला असता; पडळकरांचा जोरदार हल्लाबोल)

दरम्यान या पोटनिवडणुकीसाठी शंकर जगतापही इच्छुक होते. पण गुरुवारी, २ फेब्रुवारीला लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी ग प्रभाग येथून उमेदवारी अर्ज विकत घेतला. यामुळे अश्विनी लक्ष्मण जगताप भाजपकडून पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले होते. येत्या २६ फेब्रुवारीला कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तसेच निकाल २ मार्चलाच लागणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.