सत्तांतरानंतर अमृता फडणवीसांच्या नव्या गाण्याचा अल्बम ‘तेरे बिन अब तो सनम…’

109
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यामधील गायन कला आता सर्वश्रुत पसरली आहे. जसे राजकरणात सक्रिय नसूनही त्यांचे राजकीय घटनांवरील भाष्य करणारे ट्विट राज्यभर चर्चा घडवून आणतात, तसेच अमृता फडणवीस वेळोवेळी स्वतःच्या गाण्याचा अल्बमही प्रसिद्ध करत असतात. त्यावरूनही मोठी चर्चा घडत असते. संगीत, गायन, फॅशन अशा सर्व क्षेत्रात कायम वावर ठेवणाऱ्या अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे आले आहे.

सत्ताबदलानंतर अमृता फडणवीस पुन्हा आल्या चर्चेत 

मागील सहा महिन्यांतील राज्यातील घडामोडी राज्यातील राजकारणात मोठ्या उलथापालथ घडवून आणणाऱ्या ठरल्या. आधी राज्यसभेची निवडणूक त्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला. त्यानंतर थेट एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देऊन शिवसेनेतील तब्बल ४० आमदारांना वेगळे करून थेट सत्ताबदल करून दाखवला आणि आता शिंदे गट आणि भाजपा सरकार राज्यात आले. यात मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे यांना बिनशर्थ पाठिंबा देऊन देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर जेव्हा फडणवीस नागपूरला जात होते, तेव्हा त्यांच्यासोबत अमृता फडणवीस आवर्जून उपस्थित होत्या. त्यामुळे सत्ताबदलानंतर या सगळ्या कालावधीनंतर पुन्हा एकदा अमृता फडणवीस चर्चेत आल्या आहेत. त्याला निमित्त आहे अमृता फडणवीस यांचा नवीन गाण्याचा अल्बम!

 

View this post on Instagram

 

A post shared by Amruta Fadnavis (@amruta.fadnavis)

नव्या गाण्याला लाईकचा पाऊस 

अमृता फडणवीस यांनी शेवटचे गाणे नोव्हेंबर २०२१ मध्ये गायले होते. ‘मनिके मागे हिथे’, हे गाणे अमृता फडणवीस यांनी रिमिक्स करून गायले होते, त्यानंतर आता अमृता फडणवीस यांनी राज्यात सत्ताबदल झाल्यावर आपल्या संगीत कलेचा नवा अविष्कार दाखवून दिला आहे. ‘तेरे बिन अब तो सनम…’ अशा आशयाचे दुसरे गाणे रिलीज झाले आहे. अमृता फडणवीस यांनी हे दुसरे गाणे रिक्रिएशन केले आहे. या गाण्याचा छोटा प्रोमो स्वतः अमृता फडणवीस यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शनिवारी, १६ जुलै रोजी अपलोड केला, त्यानंतर पुढील ५ तासांत ४ हजारांहून अधिक लाईक आल्या. याआधी अमृता फडणवीस यांचे नोव्हेंबर २०२१ ला शेवटचे गाणे रिलीज झाले होते, हे गाणे त्यांनी  ‘मनिके मागे हिथे’ या गाण्याचे रिमिक्स गायले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.