शुभांशू शुक्ला यांच्या Axiom-4 मिशनची नवी तारिख आली समोर !

शुभांशू शुक्ला यांच्या Axiom-4 मिशनची नवी तारिख आली समोर !

44
शुभांशू शुक्ला यांच्या Axiom-4 मिशनची नवी तारिख आली समोर !
शुभांशू शुक्ला यांच्या Axiom-4 मिशनची नवी तारिख आली समोर !

भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला आणि इतर तीन जणांना घेऊन आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारी बहुप्रतिक्षित अ‍ॅक्सिओम-४ (Axiom-4) व्यावसायिक मोहीम आता १९ जून रोजी प्रक्षेपित होणार असल्याची घोषणा इस्रोने केली आहे. अ‍ॅक्सिओम-४ (Axiom-4) म्हणजेच अ‍ॅक्स-०४ मोहिमेतून अवकाशातील त्यांच्या पहिल्या प्रवासाची तयारी करत शुभांशू शुक्ला इतिहास रचण्यास आता सज्ज आहेत. (Axiom-4)

हे अभियान फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटर येथून स्पेसएक्सच्या विश्वसनीय फाल्कन ९ रॉकेटवरून उड्डाण करेल. गेल्या आठवड्यात, फाल्कन ९ रॉकेटमध्ये द्रव ऑक्सिजन गळती झाल्यानतर १० जून २०२५ रोजी होणारे अ‍ॅक्सिओम-४ मोहिमेचे प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आले होते. रॉकेटच्या बूस्टरमध्ये ही गळती आढळली होती. (Axiom-4)

हेही वाचा-मुंबई पोलिसांच्या सर्तकतेमुळे Bangladeshi Infiltration नी मार्ग बदलला ! आता ‘या’ मार्गे होतेय घुसखोरी

अ‍ॅक्सिओम अंतराळ मोहीम ११ जून रोजी फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटर येथून प्रक्षेपित होणार होती. परंतु प्रथम स्पेसएक्सच्या फाल्कन-९ रॉकेटमध्ये इंधन गळती आणि नंतर आयएसएसच्या रशियन विभागात गळतीमुळे ती पुढे ढकलण्यात आली. सुरुवातीला २९ मे रोजी प्रक्षेपित होणारी १४ दिवसांची मोहीम देखील ८ आणि १० जून रोजी पुढे ढकलण्यात आली होती. (Axiom-4)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.