NCP : शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात गुप्त बैठक; पडद्यामागे अनपेक्षित घडामोडी

170
NCP : शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात गुप्त बैठक; पडद्यामागे अनपेक्षित घडामोडी

राष्ट्रवादीच्या (NCP) गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात पुण्यामध्ये गुप्त बैठक पार पडली असून, पडद्यामागे अनपेक्षित घडामोडींचे संकेत मिळत आहेत.

(हेही वाचा – Investment In Maharashtra : ह्युंदाई कंपनी महाराष्ट्रात करणार ४ हजार कोटींची गुंतवणूक; पुण्यात उभारणार प्रकल्प)

उद्योजक अतुल चोरडिया यांच्या कोरेगाव पार्क येथील निवासस्थानी या तिन्ही नेत्यांमध्ये गुप्त बैठक (NCP) झाली. माध्यमांची नजर चुकवण्यासाठी अजित पवार यांनी दोन गाड्या बदलल्या आणि ते चोरडियांच्या घरी पोहोचले. त्याआधीच शरद पवार आणि जयंत पाटील तेथे पोहोचले होते. ३० मिनिटांहून अधिक काळ तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे कळते.

राष्ट्रवादीतील (NCP) बंडानंतर अजित पवार दोनवेळा शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी गेले होते. पण, ते उघडपणे. पुण्यातील भेटीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आल्यामुळे पडद्यामागे अनपेक्षित घडामोडी घडत असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. दरम्यान, अजित पवार यांनी जयंत पाटील यांच्या माध्यमातून शरद पवार यांना एकत्र येण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यासंदर्भात ही भेट असल्याची माहिती अंतर्गत सूत्रांनी दिली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.