राष्ट्रवादीच्या रोहितला गडकरींचे आश्वासन…तू बिंधास्त जा, तुझे काम झाले समज!

86

राजकीय मतभेद दूर ठेवून विकासाच्या मुद्यावर एकत्र येण्याचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा स्वभाव देशाच्या राजकारणात कौतुकाचा विषय आहे. म्हणूनच गडकरी राजकारणात अजातशत्रू म्हणू ओळखले जातात. आता स्वभावामुळे गडकरींकडे नव्या पिढीचे राजकीय नेतेही आकर्षित होत आहेत. याचा अनुभव राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहितनेही घेतला आहे.

तासगावमधल्या रस्त्याचे काम घेऊन रोहित गेला

माजी गृहमंत्री आर.आर.पाटील याचा मुलगा रोहित पाटील सध्या राजकरणात स्थिरावत चालला आहे. त्याने नुकतेच स्वतःच्या हिमंतीवर जिल्हा परिषद कवठेमहांकाळ नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकावून स्वतःला सिद्ध करून दाखवले. तेव्हापासून रोहित पाटीलची महाराष्ट्राला ओळख झाली. आता रोहित पाटील जिल्ह्याच्या विकासकामासाठी झटत आहेत. याच तळमळीतून रोहित पाटील हे दिल्लीला येऊन थेट केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना भेटले. तासगावमधल्या एका महत्त्वाच्या रस्त्याचे काम घेऊन रोहित पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची नवी दिल्लीत भेट घेतली. यावेळी रोहित पाटील यांनी आपली समस्या गडकरींच्या कानावर घातली. गडकरींनी रोहित यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यावर लगेच होकारार्थी मान डोलावली. ‘रोहित तू बिंधास्त जा…तू सांगितलेले काम झाले असे समज’, असा आश्वासन गडकरींनी रोहित पाटील यांना दिले.

(हेही वाचा संजय राऊतांकडे किती आहे संपत्ती? जाणून घ्या…)

रोहित पाटलांनी फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटले?

आज दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांची भेट घेऊन मतदारसंघातील महत्त्वाच्या विषयांबाबत चर्चा केली. तासगाव बाह्यवळण रस्ता हा प्रस्तावित असून काही काम अपूर्ण राहिले आहे. स्व.आबा असताना ह्या रस्त्याचे काम पूर्ण करण्याचा मानस त्यांचा होता. ह्या रस्त्यामुळे शहरातील व्यापाऱ्यांना व नवीन तरुणांना नवीन व्यवसाय चालू करण्यासाठी संधी उपलब्ध या रस्त्यामुळे होऊ शकते आणि शहरातील दळणवळणसाठी अत्यंत फायदेशीर होऊ शकतो हे गडकरी साहेबांना पटवून दिले. त्यामुळे सदर रस्ता हा राष्ट्रीय महामार्ग म्हणून ग्राह्य केला जावा अशी विनंती त्यांना केली. नक्कीच हा बाह्यवळण रस्ता तासगावच्या विकासासाठी नवी नांदी असेल हा विश्वास मला आहे. त्याचबरोबर कवठेमहांकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी (नगज- सांगोला महामार्ग) येथे ब्रीज अंडरपास उपलब्ध करून दिला जावा अशी विनंती केली. सदर दोन्ही कामांसाठी त्यांनी सकारात्मक दृष्टीने निर्देश दिले असून लवकरच हे दोन्ही काम होतील अशी हमी दिली. त्याचबरोबर साहेबांनी कवठेमहांकाळ नगरपंचायती बाबत माहिती घेऊन अभिनंदन केले. ‘दिल्लीमध्ये महाराष्ट्र असणं गरजेचे आहे’ या वाक्याची प्रचिती आली. रोहित तू बिंदास्त जा तू सांगितलेले काम झाले असे समज’, असेही गडकरी  म्हणाले.’

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.