राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावरुन अनेक आरोप-प्रत्यारोप होत असताना, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत यावर भाष्य केले आहे.
त्याचबरोबर राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबाबत बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर देखील टीका केली आहे. केंद्र सरकार घसरतंय, ते घसरत कोणत्या पातळीवर येतंय त्याची अनेक उदाहरणं समोर आहेत. असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
(हेही वाचाः “माझे फोन आताही टॅप होतायंत”, राऊतांचा भाजपवर निशाणा)
केंद्र सरकार घसरतंय…
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबाबत पवारांना विचारलं असता, त्यांनी यावर मोठे विधान केले आहे. महाराष्ट्रात अनेक राज्यपाल मी आजवर पाहिले. सी. प्रकाश, पी.सी अलेक्झांडर यांच्यासारखे कर्तृत्ववान राज्यपाल महाराष्ट्राला लाभलेले मी पाहिले नाहीत. त्यामुळे त्यांच्या नामावलीमध्ये हल्लीच्या राज्यपालांचं नाव घेण्यात येत आहे. त्यावर भाष्य न केलेलं बरं. केंद्र सरकार घसरतंय ते घसरत कुठल्या पातळीवर येतंय त्याची अनेक उदाहरणं समोर आली आहेत. अनेक वेळा राज्य सरकारचा लोकशाहीचा अधिकार हा डावलण्यात आला आहे.
राणे आणि मलिकांना वेगळा न्याय का?
राजकीय हेतूनं मलिकांना अटक करण्यात आली आहे. नवाब मलिक यांच्यावरील कारवाई ही चुकीच्या पद्धतीने करण्यात आली आहे. हे सूडबुद्धीचं राजकारण आहे. नारायण राणेंनाही अटक झाली होती, ते तर केंद्रीय मंत्री आहेत. मग त्यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा का घेण्यात आला नाही. राणेंना मंत्रीमंडळातून कमी का केलं नाही. नारायण राणे आणि मलिक यांच्याबाबत वेगळा न्याय का, असा सवालही पवारांनी केला.
(हेही वाचाः मोठी बातमी! रशियाकडून युक्रेनमध्ये अखेर युद्धविराम, पण….)
पटोलेंच्या वक्तव्यावर भाष्य करणं म्हणजे…
फोन टॅपिंग प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांच्या चौकशीची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. त्याबाबत पवारांना विचारले असता, नाना पटोले काय म्हणाले त्या सगळ्यावर मी भाष्य करणं काही योग्य नाही. त्यांना जे वाटलं ते त्यांनी व्यक्त केलं, असा टोला पवारांनी पटोलेंना लगावला आहे.
Join Our WhatsApp Community