-
खास प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस (शप) प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांची नास्तिक म्हणून ओळख असली तरी येत्या बुधवारी ३० एप्रिल २०२५ या दिवशी खुद्द शरद पवार श्री. तुळजाभवानी माता मंदिराचा लोकार्पण व महाआरतीला उपस्थित राहण्याची वेळ आली आहे. थोडक्यात सांगायचे तर संकटात सापडल्याने पवारांना आई तुळजाभवानी आणि महाआरती करण्याची बुद्धी झाली.
शरद पवारांना धक्का
शरद पवार (Sharad Pawar) यांचे पुतणे अजित पवार यांनी एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केले आणि ४० आमदार घेऊन एकनाथ शिंदे सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर २०२४ मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्या. लोकसभेला शरद पवार यांनी अजित पवारांवर बाजी मारली आणि १० जागा लढवत आठ खासदार निवडून आणले. विधानसभेला मात्र अजित पवार यांनी जोर लावला आणि ४१ आमदार निवडून आणले. त्यामुळे शरद पवार यांना मोठा धक्का बसला.
(हेही वाचा – IPL 2025, Punjab Kings : पंजाबचा प्रशिक्षक रिकी पाँटिंगच्या संघ निवडीवर माजी खेळाडू नाराज)
संकटसमयी महाआरती
या धक्क्यातून मोठे पवार अद्याप सावरले नाहीत, असे दिसते. कदाचित या संकटसमयी पवार यांनी श्री. तुळजाभवानी माता मंदिराचा लोकार्पण व महाआरती सोहळ्याला उपस्थित राहण्याचे ठरवले असावे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
शरद पवार (Sharad Pawar) यांचे विश्वासू आमदार जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत X या समाजमाध्यमावर माहिती दिली. ते म्हणतात : “श्री. तुळजाभवानी माता मंदिराचा लोकार्पण व महाआरती सोहळा. दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी, सकाळी 8.00 वाजता. प्रमुख उपस्थिती – आमचे श्रद्धास्थान, प्रेरणास्थान आणि भाग्यविधाते श्री. शरदचंद्रजी पवार साहेब आणि पीवहिनीसाहेब सौ. प्रतिभा काकी पवार. रात्री 10 नंतर बहुजन संस्कृतीचा जागरण गोंधळ समारंभ.”
श्री.तुळजाभवानी माता मंदिराचा लोकार्पण व महाआरती सोहळा.
दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी,सकाळी 8.00 वाजता.
प्रमुख उपस्थिती – आमचे श्रद्धास्थान, प्रेरणास्थान आणि भाग्यविधाते श्री.शरदचंद्रजी पवार साहेब आणि वहिनीसाहेब सौ.प्रतिभा काकी पवार.
रात्री 10 नंतर बहुजन संस्कृतीचा जागरण गोंधळ… pic.twitter.com/GPjXD1F0Sk— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 27, 2025
(हेही वाचा – Pahalgam Terror Attack : १७ पाकिस्तानी यु-ट्यूब चॅनलवर बंदी)
मोदी अजून काय काय करवणार आहात?
त्यांच्या या पोस्टला नेटकऱ्यांनी काही खोचक प्रतिक्रिया देऊन डिवचण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसते. एकाने म्हटले, मोदी अजून तुम्ही काय काय करवणार आहात. तर एकाने, साहेब दिवस फिरले का तुमचे? असा प्रश्न केला.
नेटकऱ्यांच्या भावना त्यांच्याच शब्दांत पुढीलप्रमाणे :
– तुळजाभवानी मंदिर आम्हा सनातनी बहुजनांचे मंदिर. धन्यवाद मोदी सरकार. देवा भाऊ. बाबरमतीच्या गद्दारांपासून हे मंदिर वाचवा.
– भाजप काळात तुमच्यावर मंदीर बनवायची आणि नास्तिक लोकांना लोकार्पणाचा मान देणं म्हणजे या भाजप ने तुम्हा भ्रष्ट लोकांना कामाला लावलं
– तुमच्या श्रद्धास्थान कुठे श्रद्धा ठेवते देवावर? फुकाचा देखावा..आई भवानी जरा तरी सद्बुद्धि दे ह्या लोकांना…
– मोदी अजून तुम्ही काय काय करवणार आहात यांच्यासारख्या हिंदू दृष्ट्या आणि जे धर्माची आमच्या देवतांची आणि परंपरांची खिल्ली उडवतात कुचेष्टा करतात आज त्यांनाच हिंदूंच्या देवतेसमोर आरत्या म्हणायला लागत आहे हाच बदल आहे.
– जय भवानी जय शिवाजी
हर हर महादेव
पवार शरद नास्तिक प्रवृत्तीचा आहे
– वांगेकाकूकडून
– जस आई तुळजाभवानी ने छत्रपतींचा हातात तलवार देऊन मुघल मुसलमानांचा गळा कापायची शक्ती दिली होती तशीच शक्ती आईने आजच्या हिंदूना देऊन, हिंदू विरोधी लोकांचे, जिहादी लोकांचे गळा कापाची शक्ती देऊ अशीच आमची प्रार्थना
– साहेब दिवस फिरले का तुमचे? आपण पुरोग्रामी विचारांचे आहात कस काय मंदिर मधे पडले? आपण बाबासाहेब आंबेडकर विचाराचे आहात. कस काय मदिर पूजा भानगडीत पडत आहात?
मोदी अजून तुम्ही काय काय करवणार आहात यांच्यासारख्या हिंदू दृष्ट्या आणि जे धर्माची आमच्या देवतांची आणि परंपरांची खिल्ली उडवतात कुचेष्टा करतात आज त्यांनाच हिंदूंच्या देवतेसमोर आरत्या म्हणायला लागत आहे हाच बदल आहे.
— pranav (@pranavabh) April 28, 2025
अरे ह्या खरजुळ्या तर देवांचा बाप आहे म्हणतो कीरे
मग असली ब्याद कोण बोलावतंय..? pic.twitter.com/XAaQWdYX8E— Appa (@appasaheb0424) April 27, 2025
साहेब दिवस फिरले का तुमचे? आपण पुरोग्रामी विचारांचे आहात कस काय मंदिर मधे पडले? आपण बाबासाहेब आंबेडकर विचाराचे आहात.कस काय मदिर पूजा भानगडीत पडत आहात?
— Sagar (@Sagarkalanki) April 27, 2025
हेही पहा –