Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र आयुक्तांची नियुक्ती होणार !

Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र आयुक्तांची नियुक्ती होणार !

50
Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र आयुक्तांची नियुक्ती होणार !
Nashik Kumbh Mela : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र आयुक्तांची नियुक्ती होणार !

नाशिकमध्ये (Nashik Kumbh Mela) होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाची घोषणा करण्यात आली असून या प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी विभागीय आयुक्तासह 21 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर कुंभमेळा आयुक्त हे या प्राधिकरणाचे सदस्य सचिव म्हणून राहणार आहेत. नाशिक (Nashik Kumbh Mela) मध्ये होऊ घातलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शासनाने प्राधिकरणाची स्थापना केली आहे, ज्या प्राधिकरणाची स्थापना करण्याची अधिसूचना सोमवारी प्रकाशित करण्यात आली असली तरी त्यावरती राज्यपाल राधाकृष्णन यांनी 3 जून रोजीच स्वाक्षरी केली आहे. (Nashik Kumbh Mela)

हेही वाचा-Mumbai Railway Accident : रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबई लोकल ट्रेन अपघातावर एका वाक्यात विषय संपवला !

राज्यपालांच्या सहीने प्राधिकरणाची अधिसूचना राजपत्रात प्रकाशित करण्यात आलेली आहे. या प्राधिकरणामध्ये एकूण 22 सदस्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नाशिकचे विभागीय आयुक्त हे अध्यक्ष म्हणून असणार आहेत तर नाशिकचे जिल्हाधिकारी आणि नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक हे उपाध्यक्ष म्हणून राहणार आहे. (Nashik Kumbh Mela)

हेही वाचा-“तुम्ही मुंबईसाठी काय केलं?”; मंत्री Ashish Shelar यांचा ठाकरे बंधूंना थेट सवाल!

या प्राधिकरणाच्या सदस्य सचिव मान मध्ये अहमदनगरचे जिल्हाधिकारी यांच्यासह नाशिक विकास प्राधिकरणाचे आयुक्त, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक ,नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त, नाशिकच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, त्रंबकेश्वर नगरपालिकेचे मुख्याधिकारी, नियोजन विभागाचे उपायुक्त, नियोजन, विभागीय नियंत्रक, महाराष्ट्र, राज्य रस्ते परिवहन महामंडळ, आरोग्य विभागाचे उपसंचालक, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता, विद्युत मंडळाचे अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य वीज प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक नगररचना विभागाचे सहसंचालक, हे पदसिद्ध सदस्य असतील तर कुंभमेळा आयुक्त हे सदस्य सचिव असणार आहे. (Nashik Kumbh Mela)

हेही वाचा- पीओपी मूर्तींवरील बंदी उठली, मूर्तिकारांच्या एकजुटीला मिळालं यश; मंत्री Ashish Shelar यांची घोषणा!

या प्राधिकरणाची बैठकी दर तीन महिन्यांनी होणार आहे. या बैठकी संदर्भामध्ये अध्यक्ष हे सर्व निर्णय घेतील तसेच दोन तृतीयांश बहुमत नसेल तर पुढील 24 तासांमध्ये बैठक घेण्यासंदर्भातला निर्णय हे अध्यक्ष घेऊ शकतात, असे स्पष्ट करण्यात आले असून अध्यक्षांना सल्ला घेण्यासाठी म्हणून कोणाला बोलवायचे कोणाला नाही याबाबतचा निर्णय देखील अध्यक्ष घेऊ शकतात. कुंभमेळ्यासाठी तयार करण्यात आलेले विकास काम किंवा इतर काही बाबींचा पुढे काय करायचं याचा निर्णय प्राधिकरणाने घ्यायचा आहे असे स्पष्ट करण्यात आले, असून दर महिन्याला प्राधिकरणाच्या कामाचा अहवाल हा मंत्री समिती पुढे देवयाचा आहे तसेच मंत्री समिती की परवानगी देखील घ्यावी लागणार आहे. सह वेगवेगळ्या नियमाप्रमाणे प्राधिकरणाला काम करण्याचे प्राधिकरणासाठी करण्यात आलेल्या अध्यादेशामध्ये म्हणण्यात आलेले आहे. (Nashik Kumbh Mela)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.