बारसू रिफायनरीच्या मुद्द्यावरून नारायण राणेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान; म्हणाले…..

133
narayan rane challenge to uddhav thackeray
बारसू रिफायनरीच्या मुद्द्यावरून नारायण राणेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान; म्हणाले.....

गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाची जोरदार चर्चा सुरू आहे. या ठिकाणी प्रकल्पासाठी माती परीक्षण सुरू आहे. पण याला स्थानिकांनी विरोधी दर्शवून काही दिवसांपासून येथे आंदोलन सुरू होते, जे आता तीन दिवसांसाठी स्थगित करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर लवकरच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे बारसू येथे जाणार असल्याचे सांगितले जात आहे. यावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे आव्हान दिले आहे.

नारायण राणे काय म्हणाले?

शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना नारायण राणे म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी कोकणात येऊन दाखवावे. आम्ही आहोत, बघूया काय होते, ते. जर उद्धव ठाकरे कोकणात आले तर त्यांना कोकणातून पळवून लावू.

(हेही वाचा – Barsu Refinery: समन्वयानेच बारसू प्रकल्पाची उभारणी होणार – उदय सामंत)

‘उद्धव ठाकरे सोडा, त्याचा प्रश्न मला विचारू नका. मला वाटत नाही, राजकारणसंबंधित त्याला डोक आहे. दुर्दैवाने म्हणावे लागते बाळासाहेबांचा चिरंजीव. पण बाळासाहेबांच्या नखाची सर या चिरंजावाला नाही. नाही कळणार राजकारण. येऊ देत कोकणात, आम्ही आहोत, बघू दे काय होत ते’, असा एकेरी भाषेत उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत राणेंनी हल्लाबोल केला.

पुढे संजय राऊतांविषयी बोलताना नारायण राणे म्हणाले की, संजय राऊत महाराष्ट्राच्या हिताचा, जनतेचा माणूस नाही. तो आता त्याचा नैराश्यामध्ये चाललेला आहे. त्याच डोके जागेवर नाही.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.