N Chandrasekhar Rao : भारत राष्ट्र समिती महाराष्ट्रात मविआ चा खेळ खराब करू शकते…

चंद्रशेखर राव (N Chandrasekhar Rao) यांनी अलिकडेच भारत राष्ट्र समितीची स्थापन केली आहे. तेलंगणांसोबत त्यांनी आता संपुर्ण भारतात पक्ष वाढीसाठी काम करण्यास सुरूवात केली आहे.

176
N Chandrasekhar Rao : भारत राष्ट्र समिती महाराष्ट्रात मविआ चा खेळ खराब करू शकते...

तेलंगणाचे मुख्यमंत्री एन चंद्रशेखर राव (N Chandrasekhar Rao) यांच्या भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्रात हातपाय पसरवायला सुरूवात केली आहे. महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील अनेक राजकीय नेत्यांनी चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला आहे.

तर काल राष्ट्रवादीचे पंढरपुर-मंगळवेढा मतदारसंघातील भागिरथ भालके पुण्यातून खास विमानाने तेलंगणात (N Chandrasekhar Rao) गेले आहेत. यातच आता महाराष्ट्रातील ११ माजी आमदार भारत राष्ट्र समितीत प्रवेश करणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे. यामुळेच मराठवाड्यातील काही विधानसभा सिटांवर मविआ चा मतांचा खेळ खराब होऊ शकतो असे जाणकारांचे मत आहे.

(हेही वाचा – औरंगजेबचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार; निलेश राणेंची जहरी टीका)

चंद्रशेखर राव (N Chandrasekhar Rao) यांनी अलिकडेच भारत राष्ट्र समितीची स्थापन केली आहे. तेलंगणांसोबत त्यांनी आता संपुर्ण भारतात पक्ष वाढीसाठी काम करण्यास सुरूवात केली आहे. यातच त्यांच्या महाराष्ट्रातही जाहीर सभा झाल्या. त्यानंतर अनेक नेत्यांनी त्यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. यातच राज्याचे माजी खासदार हरीभाऊ राठोड यांनी देखील आप मधून भारत राष्ट्र समितीत प्रवेश केला आहे.त्यामुळे भटक्या विमुक्तांसह ओबीसी मतांवर देखील त्यांचा डोळा आहे. काल भागिरथ भालके सहकुटुंबासह हैदराबाद येथे चंद्रशेखर राव यांच्या भेटीसाठी गेले आहेत. आज राज्यातील मराठवाडा, खानदेश आणि विदर्भातील एकूण ११ माजी आमदार चंद्रशेखर राव यांच्या भेटीसाठी हैदराबाद येथे रवाना झाले आहेत. त्यामुळे आता हे ११ माजी आमदार कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे.

भगीरथ भालके हे सपत्नीक टीआरएसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष शंकर आण्णा धोंडगे यांच्यासमवेत हैदराबाद इथे गेले. त्यांना घेण्यासाठी खास विमान पाठवण्यात आले. चंद्रशेखर राव (N Chandrasekhar Rao) यांच्यासोबत त्यांची भेट घेतली. दिवंगत आमदार भारत नाना भालके यांनी पक्षासाठी एवढे काम करूनही अडचणीच्या काळात आपल्याला राष्ट्रवादीने डावलले. गरज असताना आपल्या पाठीशी नेते उभे न राहिल्याने आपल्या अडचणी वाढल्या असल्याचं भालके यांनी सांगितले.

हेही पहा –

भागिरथ भालके यांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यावर ते म्हणाले की, मागेच मी स्पष्टपणे सांगितले आहे की, जे राष्ट्रवादी सोडून जात आहेत. त्यांच्याबद्दल आम्हाला कोणतीही चिंता नाही. चंद्रशेखर राव (N Chandrasekhar Rao) यांनी पाच ते सहा महिन्यात वातावरण निर्माण केलं आहे. त्याचा सहसा काहीही परिणाम राज्यात दिसणार नाही.असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.