Vidhan Parishad Election : ठाकरेंचा ‘दानवे’ डाव अन् काँग्रेसची ‘हात’घाई; विधानपरिषदेच्या आखाड्यात मविआची वज्रमूठ ढिली?

69
Vidhan Parishad Election 2026 : महाविकास आघाडीत 'अंडरस्टँडिंग' की 'गद्दारी'? विधानपरिषद निवडणुकीत एकच खळबळ
Vidhan Parishad Election 2026 : महाविकास आघाडीत 'अंडरस्टँडिंग' की 'गद्दारी'? विधानपरिषद निवडणुकीत एकच खळबळ
  • प्रतिनिधी

Vidhan Parishad Election           ​राज्यातील राजकीय पटलावर विधानपरिषदेच्या निमित्ताने महाविकास आघाडीतील धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे. शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनपेक्षितपणे अंबादास दानवे यांची उमेदवारी जाहीर करून राजकीय चाली रचल्या असतानाच, काँग्रेसने या निर्णयाला आव्हान देत आपले ‘स्वतंत्र अस्तित्व’ सिद्ध करण्याचे संकेत दिले आहेत. परिणामी, निवडणुकीपूर्वीच ‘मविआ’त मोठी बिघाडी होण्याची चिन्हे दिसत असून राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. (Vidhan Parishad Election)

(हेही वाचा – Bank Holiday : मे महिन्यात 13 दिवस बँका असणार बंद; RBI ने दिली माहिती)

​या संघर्षाची ठिणगी तेव्हा पडली जेव्हा आदित्य ठाकरे यांनी अंबादास दानवे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना स्पष्ट शब्द दिला होता की, जर ते स्वतः रिंगणात असतील तरच पाठिंबा दिला जाईल. मात्र, ठाकरेंनी दानवेंच्या गळ्यात माळ टाकताच काँग्रेसच्या गोटात नाराजी पसरली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आता पक्षश्रेष्ठींशी मसलत करून स्वतःचा उमेदवार देण्याची तयारी दर्शवली आहे, ज्यामुळे या लढाईत आता मित्रपक्षच आमनेसामने उभे ठाकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Vidhan Parishad Election)

(हेही वाचा – KDMC च्या नव्या नोकर भरती प्रक्रियेवरून वाद; स्थानिक भूमिपुत्रांना डावलले?)

​या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करताना काँग्रेस नेते भाई जगताप यांनी अत्यंत सावध पवित्रा घेतला. “काँग्रेस हा मोठा पक्ष आहे, तो तकलादू नाही; दिल्लीत वरिष्ठांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय जाहीर केला जाईल,” असे म्हणत त्यांनी शिवसेनेला सूचक इशारा दिला आहे. दुसरीकडे, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने मात्र ‘सबुरी’चा मार्ग स्वीकारला आहे. शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले की, शिवसेना उबाठाने कुणालाही उमेदवारी दिली तरी आमचा त्याला विरोध नसेल. मित्रपक्षांमधील ही विसंगती आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीच्या ऐक्याची खरी परीक्षा घेणारी ठरणार आहे. (Vidhan Parishad Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.