Muslim : मोहसीनच्या मारहाणीने निदा इस्लामलाच कंटाळली; मंदिरात धर्मांतर करून वैदेही बनली 

सिसोदिया कुटुंबाने तिला त्यांची मुलगी म्हणून दत्तक घेतले.

749
निदा खान ही मुस्लिम (Muslim) तरुणी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे घरी परतली आणि थेट तिने शिव मंदिरात मंत्रोच्चार करून सनातन धर्म स्वीकारला आहे. आता ती निदा नसून वैदेही सिसोदिया झाली आहे. वैदेही म्हणाली की, हिंदू धर्मात महिलांचा आदर केला जातो, यामुळे तिला प्रेरणा मिळाली. आता ती वैदेही म्हणून ओळखली जाणार आहे. सिसोदिया कुटुंबाने तिला त्यांची मुलगी म्हणून दत्तक घेतले. (Muslim)
निदा खान मूळची दिल्लीतील वजीराबाद येथील रहिवासी आहे. निदा हिने सांगितले की, तिने नोव्हेंबर २०२४ मध्ये मुस्लिम (Muslim) तरुण मोहसीन सैफीशी लग्न केले होते. नंतर असे आढळून आले की तो आधीच विवाहित होता आणि त्याला दोन मुले देखील आहेत. तिने विरोध केला तेव्हा तिचे सासरचे आणि मोहसीन तिचा छळ करत होते. याला कंटाळून निदा वेगळ्या भाड्याच्या घरात राहू लागली. पण मोहसीन तिच्या घरी येऊन तिला जीवे मारण्याची धमकी देत ​​असे. यामुळे त्रासून निदाने तिच्या हाताची नस कापून टाकली. त्यानंतर हिंदू घरमालकाने तिच्यावर उपचार केले. त्याने तिला हिंदू रक्षा दलाच्या पिंकी चौधरीशी भेटायला लावले. निदा यांनी सांगितले की पिंकी चौधरी तिला गौरव सिसोदिया आणि रेखा सिसोदिया यांच्याकडे घेऊन गेली, ज्यांनी सांगितले की ते निदाला त्यांची मुलगी बनवतील. त्यानंतर तिने हिंदू संघटनेच्या मार्गदर्शनाखाली हिंदू धर्म स्वीकारला. (Muslim)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.