पहलगाम (Pahalgam) येथे पाक पुरस्कृत अतिरेक्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार करून त्यांची हत्या केली. त्यात २६ जण ठार झाले. त्यामध्ये एक मुसलमानाचा समावेश आहे. हा मुसलमान स्थानिक काश्मिरी मुसलमान आहे. दहशतवाद्यांनी त्याचे नाव विचारल्यावर तो शिया मुसलमान असल्याचे लक्षात आल्यावर त्याच्यावर गोळ्या झाडल्या. अतिरेकी सुन्नी मुसलमान शिया मुसलमानांचा इतका द्वेष का करतात, हा विषय आता पुन्हा चर्चेला आला आहे.
पहलगाम (Pahalgam) या हल्ल्यात ठार झालेल्या शिया मुसलमानाचे नाव सय्यद आदिल हुसेन शाह असे नाव आहे. हा हल्ला सुरु असताना हा मुसलमान अतिरेक्यांना हल्ला करू नका असे सांगत होता, तेव्हा त्यांनी त्याला ठार केले. पाकिस्तानात अतिरेकी हे सुन्नी मुसलमान आहेत, मुसलमान शिया मुसलमानांना मुसलमान मानत नाहीत. त्यामुळे जगाच्या पाठीवर सगळीकडे शिया-सुन्नी हा वाद पेटलेला असतो.
पहलगाम (Pahalgam) येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात मुसलमान व्यक्तीचा मृत्यू झाला, त्याला जाणीवपूर्वक अतिरेक्यांनी ठार केले आहे. कारण तो शिया मुसलमान होता. अतिरेकी सुन्नी मुसलमान होते. पहलगाव येथे बहुतांश घोडेवाले शिया मुसलमान आहेत, हे अतिरेक्यांना आधीच ठाऊक होते. शिया मुसलमान तितके कट्टर नसतात, गरीब असतात, यावरूनच अतिरेक्यांनी हेरले आणि त्यांनी सय्यद आदिल हुसेन शाह याला ठार केले.– कॅप्टन सिकंदर रिझवी, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक