मुर्शिदाबाद हिंसाचार(Murshidabad Violence) प्रकरणी न्यायालयीन समितीच्या अहवालातून पश्चिम बंगाल पोलीस हिंसाचारा(Murshidabad Violence)दरम्यान निष्क्रिय असल्याचे उघडकीस आले असून सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या नगरसेवकाचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील सरकारवर टीकेची झोड उठविण्यात येत आहे. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी तृणमूल काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे.(Murshidabad Violence)
प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी म्हणाले, मुर्शिदाबाद हिंसाचारा(Murshidabad Violence)तील तथ्य शोधणाऱ्या समितीच्या अहवालावरून ममता बॅनर्जी सरकारची क्रूरता दिसून येते. पश्चिम बंगालमधील ममता सरकारवर भाजपाने जोरदार टीका करताना म्हटले की, हिंसाचारातील तथ्य शोधणाऱ्या एसआयटीच्या अहवालातून हिंदूंवरील सरकारची क्रूरता उघड झाली. एसआयटीच्या अहवालात स्पष्टपणे म्हटले आहे की, मुर्शिदाबाद हिंसाचारा(Murshidabad Violence)त हिंदूंना लक्ष्य करून हिंसाचार करण्यात आला त्यात तृणमूल काँग्रेसचे नेते सहभागी होते, असे त्रिवेदी म्हणाले.
(हेही वाचा National Herald Case : “गांधी कुटुंबाने आर्थिक गैरव्यवहारातून १४२ कोटी कमविले”; ईडीचा न्यायालयात मोठा दावा )
हिंसाचारादरम्यान पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना भाजप नेते त्रिवेदी यांनी पोलिस प्रशासनाने तृणमूलच्या नेत्यांच्या कृतींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. तृणमूल नेत्यांच्या सहभागात झालेल्या मुर्शिदाबाद हिंसाचारा(Murshidabad Violence)त केवळ हिंदूंना लक्ष्य करण्यात आले असून नेत्यांच्या कृतीकडे पोलिसांचा दृष्टिकोन हिंसाचाराला खतपाणी घालणारा आहे, असे भाजप नेते सुधांशू त्रिवेदी यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, मुर्शिदाबादपासून पहलगामपर्यंत हिंदूंना लक्ष्य करून त्यांच्यावर होणाऱ्या हिंसाचाराची साखळी स्पष्टपणे दिसून येते. मुर्शिदाबाद हिंसाचारा(Murshidabad Violence)चा तपास करण्याकरिता न्यायालयीन स्थापित एसआयटीमधून ज्या पद्धतीने तथ्ये बाहेर येत आहेत, त्यावरून ममता बॅनर्जी यांच्या सरकारची हिंदूंवरील क्रूरता आणि कट्टरपंथीयांबद्दलची अफाट आपुलकी दिसून येते,” असेही सुधांशू त्रिवेदी यावेळी म्हणाले.(Murshidabad Violence)
Join Our WhatsApp Community