Municipal Corporation Election मध्ये मविआमध्ये पडणार फूट; काँग्रेसची स्वबळाची तयारी सुरू

88

राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या (Municipal Corporation Election) पार्श्वभूमीवर काँग्रेसने स्वबळावर लढण्याच्या तयारीला प्रारंभ केला आहे, अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत यांनी दिली. कार्यकर्त्यांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या असतात आणि त्यामधूनच पक्ष मजबूत होतो, असेही ते म्हणाले. यामुळे मविआमध्ये उभी फूट पाडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ही लोकल बॉडीची निवडणूक आहे. यात थेट कार्यकर्ते रिंगणात उतरतात, त्यामुळे पक्षाची ताकद दिसून येते आणि स्थानिक पातळीवर संघटन अधिक बळकट होते,”असे मत राऊत यांनी मांडले.

महाविकास आघाडीवर सस्पेन्स कायम

महाविकास आघाडीत काँग्रेस सामील राहणार का? याबाबत विचारले असता नितीन राऊत म्हणाले की, “महाविकास आघाडी म्हणून लढायचे की नाही, याचा अंतिम निर्णय काँग्रेस वर्किंग कमिटी घेईल. स्थानिक नेतृत्वाने तयारी मात्र स्वबळावर सुरू ठेवावी, अशी सूचना आहे.

(हेही वाचा Iran – Israel War प्रकरणी रशियाची प्रतिक्रिया, जगाला आण्विक युद्धाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले)

पक्ष संघटनाला चालना देणाऱ्या निवडणुका

नितीन राऊत पुढे म्हणाले की, “स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजेच कार्यकर्त्यांसाठी राजकीय संधीचं सुवर्णद्वार असते. यातून नव्या नेतृत्वाला वाव मिळतो. त्यामुळे काँग्रेस संघटनेची नवी घडी बसवण्यासाठीही या निवडणुका महत्त्वाच्या आहेत.

काँग्रेसचा फोकस स्थानिक नेतृत्वावर

राजकीयदृष्ट्या सध्या राज्यात महत्त्वपूर्ण घडामोडी सुरू असताना काँग्रेसने दिलेला स्वबळाचा संकेत लक्षवेधी ठरत आहे. स्थानिक पातळीवर स्वतंत्रपणे ताकद उभी करण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू झाले असून, येत्या काळात पक्षाच्या रणनीतीला अधिक स्पष्टता येण्याची शक्यता आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.