Mumbai Rain Update : जोरदार पावसाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा; यंत्रणांसह, प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश

85

मागील २४ तासांपासून मुंबईसह राज्याच्या विविध भागात पावसाने झोडपून काढले आहे. या अवकाली पावसामुळे मुंबईकारांची दैना उडाली आहे. सकाळपासून मध्य आणि हार्बर रेल्वे ३५ ते ४० मिनिटे उशिराने चालू आहेत. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis Rain Update) हे मुंबई पालिका नियंत्रण कक्ष तसेच ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेत असून, संपूर्ण प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.   (Mumbai Rain Update)

(हेही वाचा – Veer Savarkar :   डॉ. विजय जोग यांचा स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतीचिन्ह पुरस्काराने गौरव; म्हणाले, “मी मार्क्सवादी तरी सावरकरप्रेमी, कारण…” )

दरम्यान अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक घेऊन सर्व यंत्रणांना सज्ज आणि सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच ज्या ठिकाणी नुकसान झाले, तिथे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासंबंधी राज्याच्या मुख्य सचिव तथा राज्याच्या आपत्ती निवारण कक्षाशी (Disaster Prevention Room) सातत्याने संपर्कात आहेत.

आपत्कालीन यंत्रणा सज्ज -गिरीश महाजन
दुसरीकडे, राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan)  यांनीही राज्यात मान्सूनपूर्व पावसामुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. त्यांनी राज्य आपत्कालीन कार्य केंद्रात तातडीने भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. त्यानंतर पावसामुळे राज्यात निर्माण झालेली आपत्कालीन परिस्थिती सक्षमपणे हाताळण्यासाठी यंत्रणा 24×7 सज्ज असल्याचे स्पष्ट केले.

(हेही वाचा – भाडेतत्त्वावरील इलेक्ट्रिक बस करार रद्द करा; परिवहन मंत्री Pratap Sarnaik यांचा आदेश)

आणखी तीन दिवस पावसाचा अलर्ट
गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) म्हणाले, राज्यात प्रथमच मान्सूनपूर्व पाऊस मे महिन्यात इतक्या मोठ्या प्रमाणात झाला आहे. पावसामुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीत आवश्यक उपाययोजना व खबरदारी घेण्याचे आदेश सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महानगरपालिक आयुक्तांना देण्यात आले आहेत. हवामान विभागाने राज्यात आणखी तीन दिवस पावसाचा अलर्ट दिला आहे. मान्सून पूर्व पावसामुळे अचानक नदी, ओढ्याच्या पाण्याची पातळी वाढ होत आहे. अशा परिस्थितीत रस्ते मार्गही बंद होण्याची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच पावसाळी पर्यटनासाठी धबधबे व अन्य ठिकाणी जातानाही नागरिकांनी दक्षता व काळजी घ्यावी.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.