Mumbai North West LS constituency : चार पर्याय, मात्र शरद पोंक्षेना अधिक पसंती

महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उबाठाचे अमोल कीर्तिकर यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली असून महायुतीमध्ये अद्याप या मतदार संघाबबत निर्णय झाला नाही मात्र शिवसेना (शिंदे) या जागेवर आग्रही आहे.

259
Mumbai North West LS constituency : चार पर्याय, मात्र शरद पोंक्षेना अधिक पसंती

काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर ते शिवसेनेत (शिंदे) प्रवेश करतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. निरुपम हे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढण्यास इच्छूक असल्याचे सर्वश्रुत आहे. जोगेश्वरीचे विद्यमान आमदार रवींद्र वायकर, अभिनेता गोविंदा यांच्यासोबत आणखी एक दावेदार भविष्यात जोडला गेला तरी या मतदार संघात हमखास निवडून येण्यासाठी सर्वमान्य असा उमेदवार कट्टर हिंदुत्ववादी आणि स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमी शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) हेच असल्याची चर्चा मतदार संघात होत आहे. (Mumbai North West LS constituency)

आणखी एक दावेदार?

महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उबाठाचे अमोल कीर्तिकर यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली असून महायुतीमध्ये अद्याप या मतदार संघाबबत निर्णय झाला नाही मात्र शिवसेना (शिंदे) या जागेवर आग्रही आहे. गेल्या काही दिवसात अभिनेता गोविंदा तसेच आमदार रवींद्र वायकर यांनी शिवसेना पक्षप्रवेश केला असून निरुपमही त्याच मार्गावर असल्याचे बोलले जात आहे. (Mumbai North West LS constituency)

कट्टर हिंदुत्वनिष्ट चेहेरा

गोविंदा मुंबईबाहेरचा, अमराठी असल्याने मतदार संघात उमेदवार म्हणून कितपत स्वीकारला जाईल याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे, तर वायकर हे स्वतःच लोकसभा निवडणूक लढविण्यास अनुत्सुक असून त्यांना स्थानिक भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडूनही विरोध होण्याची शक्यता अधिक आहे. निरुपम आले तर त्यांना भाजपाकडून निवडून आणण्यापेक्षा, पाडण्यात अधिक रस असेल, असे बोलले जाते. अशा पक्षांतर करणाऱ्या ‘टिपिकल’ राजकाराण्यांपेक्षा एक कट्टर हिंदुत्वनिष्ट चेहेरा जनता अधिक पसंत करेल, यात शंका नाही. (Mumbai North West LS constituency)

(हेही वाचा – IPL 2024 Mumbai Indians : मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी सुपरमॅनचा जंपसूट का घातला आहे?)

सर्वमान्य, निर्विवाद उमेदवार

त्यामुळे सर्वमान्य, निर्विवाद म्हणजेच स्थानिक मतदार, शिवसेना (शिंदे) पक्ष कार्यकर्ते, भाजपा पदाधिकारी-कार्यकर्ते यांचा सहज आणि उत्फुर्त पाठिंबा मिळू शकेल, असा एकच उमेदवार पोंक्षे (Sharad Ponkshe) असतील तर उबाठाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांची अनामत रक्कमही जप्त होऊ शकते, अशी शक्यता नाकारता येत नाही. (Mumbai North West LS constituency)

सहापैकी महायुतीचे चार आमदार

उत्तर-पश्चिम मतदारसंघात जोगेश्वरी पूर्व, दिडोशी, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, अंधेरी पूर्व आणि गोरेगाव हे सहा विधानसभा क्षेत्र येत असून त्यातील तीन जागांवर भाजपा आणि एक शिवसेना (शिंदे) आणि दोन उबाठा गटाचे आमदार दोन आहेत. एकूनच पोंक्षे यांच्यासाठी पोषक वातावरण असून त्याचा फायदा महायुतीला उठवता येऊ शकेल. (Mumbai North West LS constituency)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.