Mumbai Metro 9 : काशीगाव ते दहिसर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे तांत्रिक तपासणी यशस्वी झाल्यानंतर प्रवाशांकरिता खुले करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेट्रो ९ मार्गाची तांत्रिक तपासणी केली. तांत्रिक तपासणी करतानाMetro मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मेट्रो ०९ मार्गिकेचा मीरा-भाईंदर आणि मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होईल. तसेच, मेट्रो ०९ मार्गिकेचे मुख्य उद्दिष्ट अखंड कनेक्टिव्हिटी मिळविणे असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, महामुंबई मेट्रो ०९(Mumbai Metro 9) चा चाचणी टप्पा आज पूर्ण होत असून या मेट्रो ०९ चा मीरा भाईंदर आणि मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांना खूप फायदा होईल. हा टप्पा काशीगाव ते दहिसर असा असून आगामी काळात आम्हाला अखंड कनेक्टिव्हिटी मिळवायची आहे, असेही ते म्हणाले. काशीगाव-दहिसर मेट्रो ०९ आणि रेल्वे पूल एकाच रचनेत दिसतील. यामुळे मोठी वाहतूक कोंडी कमी होईल. हा विस्तार विरारपर्यंत वाढविला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
एमएमआरडीएकडून महानगर प्रदेशातील सर्व मेट्रो एकमेकांशी जोडल्या जात आहेत. हे काम आम्ही आता जलदगतीने पूर्ण करू. तसेच, ही सर्व कामे २०२७ च्या अखेरीस पूर्ण होतील, असेही ते म्हणाले. महत्त्वाचे म्हणजे यापूर्वी, मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुंबईतील रे रोड येथे टिटवाळा रोड ओव्हर ब्रिजसह पहिल्या केबल-स्टेड रोड ब्रिजचे उद्घाटन केले होते. महारेलदेखील खूप चांगले काम करत असून एमआरआयडीसीने केलेल्या दोन्ही पुलाचे उद्घाटन करण्यात आले.Mumbai Metro 9wJ-DHxP-c
Join Our WhatsApp Community