मुंबई, नवी मुंबईत International Education City ची उभारणी ; पाच विदेशी विद्यापीठांना देण्यात येणार इरादापत्र

मुंबई, नवी मुंबईत International Education City ची उभारणी ; पाच विदेशी विद्यापीठांना देण्यात येणार इरादापत्र

124
मुंबई, नवी मुंबईत International Education City ची उभारणी ; पाच विदेशी विद्यापीठांना देण्यात येणार इरादापत्र
मुंबई, नवी मुंबईत International Education City ची उभारणी ; पाच विदेशी विद्यापीठांना देण्यात येणार इरादापत्र

 

“मुंबई रायजिंग – क्रिएटिंग ॲन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी” (International Education City) या महाराष्ट्र सरकारच्या उपक्रमाअंतर्गत, पाच जागतिक स्तरावर प्रसिद्ध परदेशी विद्यापीठांना मुंबई आणि नवी मुंबईत त्यांच्या कॅम्पसची स्थापना करण्यासाठी इरादापत्रे (LOIs) अधिकृतपणे प्रदान केली जाणार आहेत. यामध्ये अ‍ॅबर्डीन विद्यापीठ (Aberdeen University), यॉर्क विद्यापीठ (University of York), वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठ (University of Western Australia), इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (Illinois Institute of Technology) आणि इस्तितुतो यूरोपीओ दी डिझाईन (Istituto Europeo di Design – IED) या विद्यापीठांचा समावेश आहे. (International Education City)

हेही वाचा-Department of Telecommunications : मोबाईल सिमकार्ड स्विच करणे आता सुलभ; दूरसंचार विभागाकडून नियमात बदल

इरादापत्र प्रदान समारंभ शनिवार, दि. १४ जून २०२५ रोजी दु. 12.00 वा. ताज महाल पॅलेस हॉटेल, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील उपस्थिती असेल. (International Education City)

हेही वाचा- इस्रायलकडून Iran च्या अण्वस्त्र तळावर हल्ला; रेडिएशन गळती झाल्याची कबुली

महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली, सिडकोमार्फत उभारल्या जाणाऱ्या या आंतरराष्ट्रीय एज्युसिटीमुळे संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या शिक्षणाची संधी मिळणार असून, हे शिक्षण विविध संस्कृतींच्या आदान-प्रदानाला चालना देईल आणि विविध पार्श्वभूमीतील विद्यार्थी व प्राध्यापकांमध्ये सहकार्य व संवाद वाढवेल. (International Education City)

हेही वाचा- Pandharpur Wari : विठुरायासाठी पायी वाटचाल अन् वारकऱ्यांच्या थकलेल्या पावलांना ‘चरणसेवा’चा आधार!

भारतामध्येच आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देणे आणि परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस महाराष्ट्रात स्थापन करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटी प्रकल्पाच्या अंतर्गत, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ५ किलोमीटर परिसरात सर्वोच्च १० परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस उभारण्याचे नियोजन आहे. ही देशातील पहिली अशा प्रकारची आंतरराष्ट्रीय एज्युकेशन सिटी ठरणार आहे. (International Education City)

हेही वाचा- झोपडपट्टीवासीयांचा लढा अखेरच्या श्वासापर्यंत लढणार; मंत्री Adv. Ashish Shelar यांची ग्वाही

हा प्रकल्प नवी मुंबई व मुंबईला जागतिक शैक्षणिक केंद्र म्हणून ओळख मिळवून देईल आणि महाराष्ट्र राज्याचे एक ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट व भारताचे पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे आर्थिक लक्ष्य २०२९ पर्यंत साध्य करण्यासाठी एक महत्त्वाचा घटक ठरेल. (International Education City)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.