प्रतिनिधी
CM Devendra Fadnavis : मुंबईतील वाहतूक आणि रेल्वे प्रवास अधिक गतिमान आणि सुरक्षित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकत, महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MAHARAIL) ने मुंबईतील पहिला केबल स्टेड रोड ओवर ब्रिज (First Cable stead road over bridge) पूर्ण केला आहे. रे रोड आणि टिटवाळा येथील या दोन नव्या पूलांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १३ मे ला झाला. (CM Devendra Fadnavis)
(हेही वाचा – भारतीय वंशाच्या Anita Anand कॅनडाच्या परराष्ट्र मंत्रीपदी, भगवतगीतेवर हात ठेवून घेतली शपथ)
या वेळी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्राला लवकरच रेल्वे फाटकमुक्त करणार असल्याचा निर्धार सरकारने केला आहे. महारेलच्या माध्यमातून आतापर्यंत ३२ पूल पूर्ण करण्यात आले असून, या वर्षाअखेरपर्यंत आणखी २५ पूल पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. हे फक्त पायाभूत सुविधा नाहीत, तर शहरांच्या प्रगतीची नवी ओळख निर्माण करणारी आकर्षक वास्तू आहेत,” असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या लोकार्पण सोहळ्यास कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा (Minister Mangalprabhat Lodha), आमदार चित्राताई वाघ, सुशीबेन शाह, आमदार मनोज जामसुतकर, प्रवीण दरेकर, महारेलचे महाव्यवस्थापक राजेशकुमार जयस्वाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तर टिटवाळा येथे आमदार विश्वनाथ भोईर, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभाग घेतला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “रे रोड केबल स्टेड ब्रिज हे मुंबईतील पहिले असे आधुनिक तंत्रज्ञानाने साकारलेले भव्य बांधकाम आहे. अत्यंत अडचणीच्या वाहतुकीत, रस्ते आणि रेल्वे सेवा सुरळीत ठेवत, या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात आली आहे. हे केवळ पूल नाही, तर मुंबईच्या सौंदर्यात भर घालणारी एक आधुनिक वास्तू आहे.” नागपूरमध्येही अशा प्रकारचे १० पूल तयार असून त्यांचेही लोकार्पण लवकरच होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
(हेही वाचा – Pakistan High Commission: भारताने पाकविरुद्ध केली कडक कारवाई; पाक अधिकाऱ्याला 24 तासांच्या आत देश सोडण्याचे आदेश)
रे रोड केबल स्टेड रोड ओवर ब्रिज
मुंबईच्या हार्बर लाईनवरील मध्य रेल्वेच्या मार्गावर, संत सावता माळी मार्गावरील रे रोड आणि डॉकयार्ड रोड स्थानकांदरम्यान, महारेलने ६ लेनचा भव्य केबल स्टेड रोड ओवर ब्रिज बांधला आहे. मुंबईतील पहिला केबल स्टेड रोड ओवर ब्रिज म्हणून याची नोंद झाली आहे. या पुलामुळे मध्य रेल्वे मार्गावर वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
(हेही वाचा – Operation Sindoor : सशस्त्र दलांच्या प्रमुखांनी राष्ट्रपतींना दिली माहिती, राष्ट्रपती म्हणाल्या…)
टिटवाळा रोड ओवर ब्रिज
कल्याण-इगतपुरी रेल्वे विभागातील टिटवाळा आणि खडवली स्थानकांदरम्यान, कल्याण रिंग रोडवर ४ लेनचा टिटवाळा रोड ओवर ब्रिज उभारण्यात आला आहे. या पुलामुळे स्थानिक वाहतुकीला मोठा लाभ होणार असून, रेल्वे फाटकांवरील गर्दी आणि अपघातांचा धोका कमी होईल. या नव्या प्रकल्पांमुळे राज्यातील वाहतूक व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल घडणार असून, महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासात महारेलचा वाटा अधिक बळकट होणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community