ADR Report : अब्जाधीशांमध्ये सर्वाधिक खासदार भाजपचे

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) ने अहवाल केला जाहीर

81
ADR Report : अब्जाधीशांमध्ये भाजपचे सर्वाधिक खासदार
ADR Report : अब्जाधीशांमध्ये भाजपचे सर्वाधिक खासदार

गरीब अधिक गरीब होतो आहे तर श्रीमंत अधिक श्रीमंत होतोय. याची प्रचिती असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) ने जाहीर केलेल्या अहवालावरून निश्चितच येते. या अहवाला नुसार सर्वच पक्षांच्या खासदारांच्या श्रीमंती मध्ये प्रचंड वाढ झालेली दिसून येत आहे. तर अब्जाधीश श्रीमंतामध्ये भाजपचे सर्वाधिक खासदार आहेत.
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) ने आपल्या अहवालात सांगितले आहे की राज्यसभेच्या२२५ सदस्यांपैकी२७म्हणजे (१२%) अब्जाधीश आहेत. सर्वाधिक अब्जाधीश खासदार भाजपचे आहेत. भाजपकडे २२५ पैकी ८५ सदस्य आहेत, त्यापैकी ६म्हणजे ७ % खासदार अब्जाधीश आहेत. काँग्रेसच्या ३० सदस्यांपैकी ४ म्हणजे १३ % अब्जाधीश आहेत.
एडीआरने १८ऑगस्ट रोजी हा अहवाल आपल्या वेबसाइटवर टाकला आहे. ADR ने नॅशनल इलेक्शन वॉच (NEW) च्या सहकार्याने एकूण २३३ राज्यसभा खासदारांपैकी २२५ च्या गुन्हेगारी आणि आर्थिक स्थितीचे विश्लेषण केले आहे. निवडणुकीदरम्यान उमेदवारांनी दिलेल्या शपथपत्राच्या आधारे एडीआरने ही माहिती दिली आहे.

(हेही वाचा : Ganesh festival : गणेशोत्सवात पारंपरिक वाद्यांचा वापर करा, आमदार अश्विनी जगताप यांचे आवाहन)
राज्यसभेच्या विद्यमान खासदारांची सरासरी मालमत्ता ८०.९३ कोटी रुपये आहे. भाजप खासदारांची सरासरी मालमत्ता ३०. ३४ कोटी आहे. काँग्रेसच्या ३० खासदारांची सरासरी मालमत्ता ५१.६५ कोटी रुपये, तृणमूल काँग्रेसच्या १३ खासदारांची सरासरी मालमत्ता ३. ५५ कोटी रुपये, वायएसआर काँग्रेसच्या ९ खासदारांची मालमत्ता ३९५. ६८ कोटी रुपये, भारत राष्ट्र समिती (BRS) च्या ७ खासदारांची मालमत्ता आहे. ७९९. ४६ कोटी रुपये आहे.
९ पैकी ४YSR काँग्रेस (४४ %), आम आदमी पार्टीचे १० पैकी ३ (30%) आणि BRS खासदारांपैकी ३ (४३%) अब्जाधीश आहेत. जर आपण राज्यांबद्दल बोललो तर, सर्वाधिक अब्जाधीश खासदार आंध्र प्रदेश (४५%) आणि तेलंगाणातील (४३%) आहेत.या २२५ खासदारांपैकी७५ (३३%) यांच्यावर फौजदारी खटले आहेत. ४१ खासदारांवर म्हणजे सुमारे १८% गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल आहेत. त्याचवेळी दोन खासदारांवर खुनाचे (IPC कलम ३०२) आणि ४ जणांवर महिलांविरोधातील गुन्हे दाखल आहेत.

हेही पहा :

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.