मोरबी दुर्घटनेत भाजप खासदाराच्या कुटुंबातील 12 जणांचा मृत्यू

173

मोरबीमध्ये मच्छू नदीवरील झुलता पूल कोसळल्याने आतापर्यंत 141 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. प्रशासनाकडून मदतकार्य युद्ध पातळीवर सुरु आहे. या पुलाची क्षमता केवळ 100 लोकांचीच आहे. मात्र दुर्घटना घडली त्यावेळी या पुलावर तब्बल 300 ते 400 जण उपस्थित होते. अशातच आता या संदर्भात आणखी एक माहिती समोर आली आहे. गुजरातमधील खासदार मोहन कुंदारिया यांच्या नातेवाईकांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. कुंदारिया यांचे तब्बल 12 नातेवाईक या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडले असून, बहिणीच्या सासरच्या मंडळींचा समावेश आहे.

(हेही वाचा: 7th Pay Commission: सरकारी कर्मचा-यांचा पगार पुन्हा एकदा वाढणार? DA नंतर मूळ पगारात होणार वाढ )

दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मदत जाहीर

मोरबी दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2 लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच, जखमींना 50 हजारांची मदत घोषित करण्यात आली आहे.

….म्हणून घडली दुर्घटना

एका प्रत्यक्षदर्शीने दावा केला आहे की, काही तरुण पुलावर पाय मारत होते. काही तरुणांनी झुलता पूल तोडण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा एक व्हिडीओही व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काही तरुण पुलावर पाय आपटताना दिसत आहेत. पोलीस त्या तरुणांचाही शोध घेत असल्याची माहिती आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.