Monsoon Session : अंबादास दानवेंच्या शेरोशायरीला दरेकरांचे कवितेतून चोख प्रत्युत्तर

100
Monsoon Session : अंबादास दानवेंच्या शेरोशायरीला दरेकरांचे कवितेतून चोख प्रत्युत्तर

तीन दिवसांच्या निलंबनानंतर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शुक्रवारी (५ जुलै) सभागृहात उपस्थिती लावली. यावेळी अर्थसंकल्पावर भाषण केल्यानंतर शेरोशायरीत सरकारवर टीका केली. त्यांच्या या शेरोशायरीला भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी कवितेच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिले. (Monsoon Session)

दरेकर म्हणाले की, अंबादास दानवेंच्या म्हणण्यानुसार अर्थसंकल्प म्हणजे मुर्खपणाचे लक्षण आहे. पण त्यांचे काय म्हणणे होते ते चार-पाच दिवसांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यांनी आता भाषण करताना म्हटले की, खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा. अंबादास दानवे असे वक्तव्य करत असताना मी कविता केली आहे. ती मी तुम्हाला ऐकवतो. (Monsoon Session)

(हेही वाचा – Monsoon Session 2024: महसूली खर्चाची तूट आणि राज्यावर असणारे कर्ज यावर विरोधकांना Ajit Pawar यांनी दिले उत्तर; म्हणाले… )

दरेकर कविता करताना म्हणाले की, विचारी तूच तुझ्या मना, महाराष्ट्रात विकासाच्या दिसतात की नाही पाऊलखुणा. तुम्ही काहीही म्हणा, निंदा किंवा वंदा महाराष्ट्राचा विकास करत आहेत शिंदे, फडणवीस आणि अजितदादा. त्यामुळे सर्वसामान्य माणूस युतीच्या मागे उभा आहे खंदा. पुन्हा चालू राहील महायुतीचा शिव्या देण्याचा आपला नियमित धंदा. (Monsoon Session)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.