मुंबईत सहप्रवाशांना सीटबेल्ट सक्ती नको! मनसेचे मुख्यमंत्र्यांना पत्र, अन्यथा आंदोलनाचा इशारा

86

१ नोव्हेंबरपासून मुंबईतील सर्व वाहनांना सीटबेल्ट सक्ती करण्यात आली असून ११ नोव्हेंबरपर्यंत दंड आकारण्यात येणार नसून फक्त जनजागृती केली जाईल अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे. या आदेशाला टॅक्सीमेन युनियनने विरोध केल्यानंतर आता या सक्तीविरोधात मनसेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देखील लिहिले आहे. सहप्रवाशांना सीटबेल्ट सक्तीचा मागे न घेतल्यास मनसेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

( हेही वाचा : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! लवकरच सुरू होणार सातवे रेल्वे टर्मिनस )

सहप्रवाशांना सीटबेल्ट सक्ती करू नये यासाठी मनसे सरचिटणीस आणि वाहतूक सेना अध्यक्ष संजय नाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. मुंबईत ११ नोव्हेंबरपासून सीटबेल्ट सक्ती केली जाणार आहे. गाडीत मागे बसलेल्या व्यक्तीने सीटबेल्ट लावला नसेल तर २०० रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे.

मनसेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र

मुंबईत वाहतूक कोंडीची समस्या सर्वाधिक आहे त्यामुळे शहरात मागे बसणाऱ्यांसाठी सीटबेल्ट सक्ती नको आधीच मुंबईकरांना विविध प्रकारचे दंड आकारले जातात. मुंबईत मेट्रोची कामे, पूल, निकृष्ट दर्जाचे रस्ते, खड्डे तसेच रस्त्यांची कामे चालू आहेत. यामुळे वाहतूक रहदारीची समस्या मोठ्या प्रमाणात मुंबईत होते. त्यामुळे सीटबेल्टची सक्ती मागे न घेतल्यास मनसेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

दरम्यान सीटबेल्ट न लावणाऱ्या वाहन चालक आणि मालकाविरोधात कारवाई करताना दंडात्मक कारवाई करण्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. मोटर वाहन कायदा १९८८ कलम १९४(ब) नुसार एक हजार रुपये दंड आकारण्यात येईल. ११ नोव्हेंबर पर्यंत कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतर चालक अथवा सहप्रवाशांनी सुरक्षा बेल्ट न लावला प्रवास केल्यास चालकावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.