राष्ट्रवादी शरद पवार(Sharad Pawar) गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यात प्रति तुळजाभवानी मंदिराची प्राणप्रतिष्ठापना केली. या मंदिराची प्राणप्रतिष्ठापना अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar) यांनी सपत्नीक उपस्थित राहून केली. यावेळी माध्यमांशी बोलताना शरद पवार(Sharad Pawar) म्हणाले होते की, माझ्या बाबतीत अर्ध सत्य सांगितले जाते पण मी लहानपणापासून पूजा करतो. या वक्तव्याचा प्रकाश महाजनांनी खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, शेवटी शरद पवारांना(Sharad Pawar) हिंदू धर्माला शरण जावे लागले. ते स्वतःला पूजा करताना देखील दाखवू शकतात, अशा शब्दांत प्रकाश महाजन यांनी पवारांवर सडकून टीका केली. हिंदू म्हणून मारले हे सांगायला का वाईट वाटतंय? पर्यटकांनी धर्मासाठी बलिदान दिले हे त्यांना कधीच कळणार नाही, असेही प्रकाश महाजन यावेळी म्हणाले.
शरद पवार(Sharad Pawar) स्वतःची मुंज झालेली पण दाखवू शकतात. हिंदू धर्माच्या दूर जाऊन राजकारण होऊ शकत नाही, हे पवारांच्या लक्षात आले आहे, असे म्हणत मनसे नेते प्रकाश महाजन यांनी खोचक टोला लगावला. तसेच, मंदिरात पूजा करून धर्माजवळ जाण्याचा हा प्रकार आहे. ते पुढे म्हणाले, जितेंद्र आव्हाडांना तुळजाभवानीचे मंदिर बांधावे लागले. ही हिंदूंची ताकद आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर दहशतवाद्यांनी धर्म विचारल्याबाबत शंका उपस्थित केली होती. यावर बोलताना पवारांना(Sharad Pawar) अतिरेक्यांचा धर्म का लपवायचाय?, असा सवालही महाजन यांनी यावेळी उपस्थित केला.(Sharad Pawar)
Join Our WhatsApp Community