फटाक्यांवरुन खोपकरांनी शिवसैनिकांना भरला दम! म्हणाले, ‘मी घुसून मारेन…’

138

फटाके उडवण्यास विरोध करणा-यांना मनसेकडून स्पष्ट इशारा देण्यात आला होता. फटाक्यांना विरोध करणा-यांनी देश सोडून जावे असे मनसेच्या चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी म्हटले होते. त्यावरुन त्यांना ट्रोल करण्यात आले असून शिवसैनिकांनीही त्यांच्यावर टीका केली होती. मात्र आता खोपकर यांनी शिवसैनिकांवर जोरदार निशाणा साधला असून जर माझ्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्यात आली तर मी घुसून मारेन, असा सज्जड दम अमेय खोपकर यांनी शिवसैनिकांना दिला आहे.

काय म्हणाले खोपकर?

अमेय खोपकर यांनी ज्यांना फटाक्यांचा त्रास होतो त्यांनी देश सोडून निघून जावे, असा इशारा मंगळवारी ट्वीट करत दिला होता. बुधवारी आपल्या या विधानाबाबत अमेय खोपकर यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिलं आहे. मी माझ्या मतावर ठाम आहे. मला शिव्या घालणारे हे लोक हे शिवसेनेचेच आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून जर माझ्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्यात आली तर मी त्यांना घुसून मारेन, हा दम मी त्यांना भरतोय, असा इशारा अमेय खोपकर यांनी दिला आहे.

किशोरी पेडणेकरांवर साधला निशाणा

तसेच यावेळी खोपकरांनी किशोरी पाडणेकर यांच्यावर देखील टीका केली आहे. पेडणेकरांना आता फटाक्यांचा त्रास होतो का? भोंग्यांचा त्रास त्यांना कधी झाला नाही का?, त्यांना कदाचित एमआयएमसोबत युती करयाची असेल म्हणून त्या अशी टीका करत असतील. या बेअक्कल लोकांनी शिवाजी पार्कवर जावं आणि जो सण आम्ही साजरा करत आहोत तो पहावा, अशा शब्दांत खोपकर यांनी पेडणेकरांवर निशाणा साधला आहे.

खोपकरांचे ट्वीट

ज्या कुणाला फटाक्यांचा त्रास होत असेल त्यांनी बॅगा भरायच्या आणि लगेच मुंबई काय,देश सोडून निघून जायचं. अशा हिंदूद्वेष्ट्या मुसलमानांनी आमच्या देशात रहायची गरजच नाही.आमचा सण आहे,आम्ही फटाके वाजवणारच.आम्ही वर्षानुवर्षं भोंग्यांचा त्रास सहन करतोय ना,मग तुम्ही चार दिवस फटाके सहन करा, असे ट्वीट अमेय खोपकर यांनी केले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.