विश्वप्रवक्ते संजय राऊत आणि टोमणे प्रमुखांनी शिवसैनिकाचा बळी घेतला; मनसेचा शिवसेनेला टोला

88

राज्यसभा निवडणुकीत शुक्रवार मध्यरात्रीपासून मोठे राजकीय नाट्य पाहायला मिळाले. अखेरीस निकाल लागला आणि महाविकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत. तर भाजपचे तीनही उमेदवार विजयी झाले. पण, या निवडणुकीत महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. कारण मविआची जवळपास 9 मते फुटली असल्याचे समोर आले आहे. शिवसेनेचे संजय पवार यांचा पराभव झाल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. आता याच दरम्यान, मनसेने शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे.

मनसेच्या नेत्याचे ट्वीट

मनसे नेते गजानन काळे यांनी ट्वीट करत, शिवसेनेला चिमटा काढला आहे.  गजानन काळे यांनी ट्वीट करत म्हटलं की, राष्ट्रवादी समोर लाचारी पत्करुन आणि औरंग्याच्या थडग्यावर नतमस्तक होणा-या त्या निजामाच्या औलादीचा मदत घेऊन ही सेना तोंडावर आपटली. …तेल गेले, तूप गेले आणि हाती धुपाटणे आले. विश्वप्रवक्ते संजय राऊत आणि टोमणे प्रमुखांनी सर्वसामान्य शिवसैनिकाचा बळी दिला, असे ट्वीट केले आहे.

( हेही वाचा: Sharad Pawar on Rajya Sabha Election: हा चमत्कार मान्य करावा लागेल; पवारांची निकालावर प्रतिक्रिया )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.