महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आता लवकरच एका नव्या भूमिकेत पहायला मिळणार आहेत. आपल्या झुंजार शैलीने राजकीय वर्तुळात दबदबा निर्माण करणा-या राज ठाकरेंचं आता वैयक्तिक आयुष्यात आता आजोबा म्हणून प्रमोशन होणार आहे.
राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे आणि पत्नी मिताली ठाकरे यांच्याकडे ‘खूशखबर’ असल्याची माहिती समोर आली आहे. एप्रिल महिन्यात राज ठाकरे यांच्या शिवतीर्थवर नवा पाहुणा येणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे आता लवकरच ‘बाळ’राजांचं आगमन होणार असल्याने ठाकरे कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे.
शिवतीर्थवर उत्साहाचे वातावरण
या गोड बातमीमुळे सध्या राज ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या दादरच्या शिवतीर्थवर उत्साहाचे वातावरण असून नव्या पाहुण्याच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. नव्या पाहुण्याच्या आगमनासाठी राज ठाकरे, शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे आणि मिताली ठाकरे उत्सुक असून, संपूर्ण ठाकरे कुटुंब ‘बाळ’ ठाकरेंच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. नुकतीच अमित ठाकरेंना मनसेच्या विद्यार्थी सेनेची जबाबदारी देण्यात आली आहे. अशातच आता अमित ठाकरे बाबा होणार असल्याने, राजकीय आणि खासगी आयुष्यात प्रमोशन देखील त्यांना बढती मिळणार आहे. त्यामुळे आता या दुहेरी भूमिका ते कशी सांभाळणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. काही महिन्यांपूर्वीच राज ठाकरे हे त्यांच्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थानावरुन ‘शिवतीर्थ’ या नव्या निवासस्थानी रहायला आले आहेत. याच नवीन घरामध्ये आता ही चिमुकली पावलं खेळताना, बागडताना दिसणार आहेत.
(हेही वाचा – “मलिकांचा राजीनामा घेतला नाही तर… “, भाजपने दिला इशारा)
२०१९ साली अमित-मिताली अडकले विवाह बंधनात
मिताली ठाकरेंचे सासर आणि माहेर मुंबई असल्याने बाळाचा जन्म देखील मुंबईत होणार आहे. अमित ठाकरे यांचा विवाह २७ जानेवारी २०१९ रोजी मिताली बोरुडे यांच्याशी झाला. अमित यांच्या लग्नाला राजकीय नेत्यांसह, उद्योग, चित्रपट तसेच इतर क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. लोअर परळ येथील सेंट रेजिस या आलिशान हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडला होता.